Atrocities against a woman accused of viral photos; One arrested | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; एकाला अटक 
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; एकाला अटक 

ठाणे: मैत्रीतून काढलेला फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी देत मुंबईत कामानिमित्त सहा महिन्यांपूर्वी आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. याप्रकरणी अत्याचार करणा-या मुंबई चेंबूर येथील राकेश नारायण धुमक (39) याला ठाणे नगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. तर त्याला येत्या 20 मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित तरुणी आणि राकेश यांची एक सॅण्डवीच गाडीवर 15 दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री पुढे वाढत असताना, त्यांनी सहज असा एक एकत्र फोटो काढला. तो फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी दाखवून राकेशने त्या तरूणीला मोटारसायकलवरुन ठाण्यातील लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित तरुणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर केल्यावर 20 मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एम. गोते करत आहेत.


Web Title: Atrocities against a woman accused of viral photos; One arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.