तबेल्यातील जनावरांवर माथेफिरुचा प्राणघातक हल्ला; पाच म्हशींचा मृत्यू तर ११ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:53 PM2022-05-15T23:53:45+5:302022-05-15T23:55:04+5:30

पोलीस निरीक्षक दीप बने यांनी पाळीव प्राण्यांची क्रूरपणे हत्या केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवित पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत .

Assault on animals in stables; Five buffaloes killed and 11 injured in Mathefiru attack | तबेल्यातील जनावरांवर माथेफिरुचा प्राणघातक हल्ला; पाच म्हशींचा मृत्यू तर ११ जखमी 

तबेल्यातील जनावरांवर माथेफिरुचा प्राणघातक हल्ला; पाच म्हशींचा मृत्यू तर ११ जखमी 

googlenewsNext

भिवंडीभिवंडी शहरातील बंदर मोहल्ला भागात असलेल्या म्हशींच्या तबेल्यातील म्हशी रेडे यांच्यावर रात्रीच्या अंधारात प्राणघातक हल्ला करीत कत्तल केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे .या हल्ल्यात ५ म्हशी मृत झाल्या असून तब्बल ११ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. शहरातील बंदर मोहल्ला येथील तबेल्याची जागा भाड्याने घेऊन अरहम मोमीन यांनी त्या ठिकाणी म्हशी ठेऊन दुधव्यवसाय सुरू केला होता.

शनिवारी मध्यरात्री नंतर या ठिकाणी आलेल्या अज्ञात माथेफिरूने धारदार सुऱ्याने तबेल्यात दावणीला बांधलेल्या ५ म्हशींच्या माने वर वार करून त्यांची हत्या केली. तर इतर ११ म्हशी रेडे यांच्या वर हल्ला करतानाच त्यांच्या पायांच्या नसा जायबंदी केल्याने त्यांना अपंगत्व येऊन गंभीर जखमी अवस्थेत पडल्या आहेत. सकाळी दूध काढण्यासाठी कामगार तबेल्यात आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी अरहम मोमीन यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक दीप बने यांनी पाळीव प्राण्यांची क्रूरपणे हत्या केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवित पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत .

Web Title: Assault on animals in stables; Five buffaloes killed and 11 injured in Mathefiru attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.