रस्त्याचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:21+5:302021-04-04T04:41:21+5:30
-------------- स्मशानभूमीत बाकडे उल्हासनगर : कॅम्प नं. ४ येथील मुक्तीबोध स्मशानभूमीमध्ये महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष ...

रस्त्याचे डांबरीकरण
--------------
स्मशानभूमीत बाकडे
उल्हासनगर : कॅम्प नं. ४ येथील मुक्तीबोध स्मशानभूमीमध्ये महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांच्या प्रयत्नातून नागरिकांना बसण्यासाठी बाकडे लावण्यात आले, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष परमानंद गिरेजा यांनी दिली. मात्र या वेळी स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली.
-----------------------
शिवसेनेचे निवेदन
उल्हासनगर : हाजी मलंग बाबा दर्ग्यावर पौर्णिमेच्या दिवशी आरतीच्या वेळी एका गटाने एकत्र येत घोषणाबाजी केली. या प्रकरणी कोरोना नियमांचे उल्लंघन व पोलिसांना धक्काबुकी करून सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी नोटिसा देऊन काही जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आदी पदाधिकारी यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
--------------------------