शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोड दृष्टीपथात, 'एमसीझेड'कडे मागणार परवानगी; आराखडा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:31 IST

१२ वर्ष कागदावर असलेल्या कोस्टल रोड मार्गी लागण्याची शक्यता. पालिकेच्या माध्यमातून आराखडा तयार.

ठळक मुद्दे१२ वर्ष कागदावर असलेल्या कोस्टल रोड मार्गी लागण्याची शक्यता. पालिकेच्या माध्यमातून आराखडा तयार.

ठाणे : मागील १२ वर्षे कागदावर असलेला किंबहुना चर्चेत असलेला मुंबई - नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीर्पयतचा कोस्टल आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून तो एमएमआरडीएकडे पाठविण्यात आला आहे. तर दुसरीकडे एमएमआरडीएने मधल्या वेळात सीआरझेडच्या परवानग्या घेण्याच्या सूचना पालिकेला केल्या असल्याने त्यानुसार आता ठाणे महापालिकेने त्यानुसार प्रस्ताव तयार करुन तो येत्या काही दिवसात एमसीझेड म्हणजे महाराष्ट्र किनारपटटी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्याची तयारी सुरु केली आहे. या कोस्टल रोडमध्ये सुमारे १३ किमीच्या मार्ग असणार असून काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी १२५१ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या मार्गामुळे घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. २००९ मध्ये कोस्टरल रोडची चर्चा सुरु झाली होती. परंतु आता पालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आता हा मार्ग सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरु असते. त्याचबरोबर या शहरातून बंदराच्या दिशेनेही अवजड वाहनांची वाहतुक सुरु  असते. यापैकी जेएनपीटी बंदर ते गुजरात या मार्गावरील वाहने घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्याही मोठी आहे. यामुळे ठाण्यातील माजिवाडा नाक्यापासून ते घोडबंदर टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोंडीचा फटका बसत असून याबाबत त्यांच्याकडून संतापही व्यक्त होत आहे. 

या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कोस्टल मार्गाची घोषणा करण्यात आली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंत असा हा मार्ग असणार आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक सोडली जाणार आहे. 

आराखडा तयार

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा आराखडा नुकताच तयार केला असून तो आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हा आराखडा पाठविण्यात आला आहे. हा मार्ग सुमारे १३ किमीचा असणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार ४० ते ४५ मीटरचा आठपदरी रस्ता असणार आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. १.१३ किमीचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका असा हा मार्ग असणार आहे. 

एकूण मार्गापैकी ७.२९ किमीचा मार्ग सीआरङोड भागातून जाणार आहे. त्यामुळे आता सीआरङोची परवानगी घेण्याची तयारी पालिकेने केली आहे. या मार्गात सुमारे ४० टक्के सीआरङोड बाधित होणार आहे. त्यामुळे ती कशी कुठे, कशा पद्धतीने बाधित होणार आहे, याचा आरखडा पालिकेने तयार केला असून आता त्याची परवानगी घेण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. त्यानुसार त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून येत्या दोन ते तीन दिवसात एम.सी.झेडकडे पालिका हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्यानुसार पुढील तीन ते चार दिवसात त्याला परवानगी मिळून या मार्गातील प्रमुख अडथळा दूर होणार असल्याचे पालिकेने म्हणणे आहे. त्यानुसार ही परवानगी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम सुसाट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी १२५१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका