शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत  
3
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
4
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
5
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
6
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
7
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
8
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
9
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
10
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
11
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
12
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
13
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
14
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
15
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
16
‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले
17
या ‘गुरुजीं’ची गय नको! विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोठडीत पाठवलं पाहिजे
18
निवडणूक आयोगाचे भाजपशी साटेलोटे, घ्या पुरावा! 'तो' विचित्र आदेशच संगनमत उघड करतो
19
आर्थिक राजधानीतही ‘ती’चा छळ थांबेना, जाच काही संपेना; ९ महिन्यांत २१ जणींनी संपविले आयुष्य
20
पाच दिवसात ‘धवललक्ष्मी’ ने कापले ४५ किमी अंतर; सॅटेलाइट टॅगद्वारे कासवाचा अभ्यासकांकडून मागोवा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:07 IST

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी साधला संवाद

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी साधला संवाद

ठाणे : आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळवताना, कशाप्रकारे उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वाल्हीव्हरे गावचे सरपंच रघुनाथ खाकर आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवले यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातूना ऑनलाईन संवाद साधला.कोरोना रोखण्यासाठी काय,काय उपाययोजना करुन यश मिळवले आदींची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी संवाद साधला. या  संवादाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे खाकर आणि आशा स्वयंसेविकांना भोंडिवले यांनी मनसोक्त संवाद साधला. या दोघांनी मनोगत व्यक्त करताना आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळवताना कशाप्रकारे उपाययोजनां केल्या, त्यासाठी कोणकोणत्या समस्यांना तोंड देऊन गाव कोरोनामुक्त केले आदी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आँनलाईन संवाद साधताना कथन केली. .  "आमच्या गावात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढलेला नसून गाव पूर्णतः कोरोनामुक्त आहे," असे खाकर यांनी सांगितले. "गावात संसर्ग होऊ नये यासाठी मार्च २०२० लाच गावात लॉकडाऊन केले. गाव दक्षता समिती स्थापन करून नागरिकांना कोरोना या विषाणूची आणि लक्षणाची माहिती दिली. नागरिकांची भीती कमी करून त्रिसूत्रीचे नियम पटवून दिले. गावाला वारंवार हात धुण्याची सवय लावली. गाव मालशेजच्या पायथ्याशी असल्याने पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी गर्दी नियंत्रणावर भर दिला. संपूर्ण गावात आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप केले. गावातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले. तसेच गावातल्याच जंगलात मिळणारी ‘गुळवेल’ गावातल्या प्रत्येक घरात वाटप केले. त्यामुळे लोकं ‘गुळवेल’ चा काढा प्यायले. त्याचबरोबर गावातील जास्तीत नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यश आले. तिसऱ्या लाटेचीदेखील गावाची तयारी केली असून गावकरी उत्तम सहकार्य करत आहेत. त्यामुळे गाव अखेरपर्यंत कोरोनामुक्त राहील," असा ठाम निर्धार सरपंच खाकर यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलताना व्यक्त केला.यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलताना आशा स्वयंसेविका  भोंडिवले, यांनी कोरोनाच्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी, अभियानाच्या वेळी सर्वेक्षण करून कोरोना रूग्णासह क्षयरोग, मधुमेय, कर्करोग, सारी, उच्चरक्तदाब आदि आजाराच्या व्यक्तींनादेखील संदर्भसेवा दिल्याचे सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे