शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात प्रथमच रंगणार कला, क्रीडा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 00:45 IST

ठाणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ठाण्याच्या या वैभवात आणखी भर घालण्यासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कला

ठाणे : ठाणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ठाण्याच्या या वैभवात आणखी भर घालण्यासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कला आणि क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३१ जानेवारी ते ७ फेबु्रवारी २०१६ या कालावधी हा महोत्सव संपूर्ण शहरभर साजरा होणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी, क्रीडा सभापती संभाजी पंडीत, भाजपचे गटनेते संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, उपायुक्त संदीप माळवी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचा शुभारंभ ३१ जानेवारी रोजी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात पार पडणार आहे. या सर्व खेळांच्या संघांचे संचलन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाअंतर्गत २ ते ६ फेबु्रवारी या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ज्ञानसाधना कॉलेज जवळील मैदानात पार पडणार आहेत. तर स्पर्धेच्या शुभारंभापूर्वीच म्हणजेच २९ जानेवारी ते २ फेबु्रवारी या कालावधीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा साकेत पोलीस मैदान, ६ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल, ५ ते ७ फेबु्रवारी जिल्हास्तरीय एॅथलेटीक्स स्पर्धा, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, १ ते ३ फेबु्रवारी जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा घंटाळी मैदान, १ ते ४ फेबु्रवारी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह, १ ते ५ फेबु्रवारी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, १ ते ५ फेबु्रवारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा - शरद पवार क्रीडा संकुल, ४ ते ६ फेबु्रवारी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा - दादोजी कोंडदेव क्रीडागृह, २ ते ६ फेबु्रवारी जिल्हास्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धा - सरस्वती सेकंडरी हायस्कूल (नौपाडा), ६ ते ७ फेबु्रवारी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा - रहेजा गार्डन तरण तलाव, ६ ते ७ फेबु्रवारी बुद्धीबळ स्पर्धा - सेंट जॉन हायस्कूल, १ फेबु्रवारी - जिल्हास्तरीय ब्रास बँड स्पर्धा - चेंदणी कोळीवाडा, ६ फेब्रुवारी सायकल स्पर्धा - तीनहातनाका या ठिकाणी होणार आहे.