रेशनकार्डवर पत्ता बदलण्यासाठी लाच घेणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:58+5:302021-03-20T04:39:58+5:30

ठाणे : रेशनकार्डवर पत्ता बदलण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या अजयकुमार गुंड (वय ४२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ...

Arrested for taking bribe to change address on ration card | रेशनकार्डवर पत्ता बदलण्यासाठी लाच घेणारा अटकेत

रेशनकार्डवर पत्ता बदलण्यासाठी लाच घेणारा अटकेत

ठाणे : रेशनकार्डवर पत्ता बदलण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या अजयकुमार गुंड (वय ४२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल झाला आहे.

रेशनकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी तसेच मुलाचे नाव लावण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडून गुंड हे अडीच हजारांच्या लाचेची मागणी करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची ठाणे एसीबीने १० मार्च २०२१ ला पंचांच्या मदतीने पडताळणी केली. तेव्हा गुंड यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजारांचा पहिला हप्ता मागितला. काम पूर्ण झाल्यानंतर पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचून तक्रारदार यांना दोन हजारांच्या लाचेच्या रकमेसह पाठविण्यात आले. तेव्हा ही दोन हजारांची रक्कम स्वीकारताना त्यांना एसीबीने रंगेहात अटक केली.

---------------

Web Title: Arrested for taking bribe to change address on ration card