लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बाळकूम येथील अक्षय पदा (२१) यांच्या घरातून चार मोबाइलची चोरी करणाऱ्या धनराज राठोड (२०, रा. बाळकूम, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्याकडून या चोरीसह अन्य एक असे ४३ हजारांचे पाच मोबाइल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.बाळकूम येथील रहिवासी अक्षय हे त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद करून त्यांचे सहकारी रूपेश गावडे, अनिमेश सरकार आणि रोहित कुळयेटी यांच्यासह घरात झोपले होते. त्यावेळी २६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत शिरलेल्या धनराज याने या सर्व कामगारांचे ३३ हजारांचे चार मोबाइल घेऊन पलायन केले. याप्रकरणी २८ ऑक्टोबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे, निरीक्षक संजय निंबाळकर आणि प्रियत्तमा मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे, जमादार राजेंद्र मोरे, पोलीस नाईक निखिल जाधव, अभिजित कलगूटकर, भरत घाटगे आणि पोलीस कॉन्स्टेबल शंकर राठोड आदींच्या पथकाने २९ ऑक्टोबर रोजी राठोड याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली. त्याच्याकडून या चार मोबाइलसह अन्य एका ट्रक चालकाचा मोबाइल असे पाच मोबाइल त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. त्याला १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
बाळकूम येथील घरातून चार मोबाइलची चोरी करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 00:47 IST
बाळकूम येथील अक्षय पदा (२१) यांच्या घरातून चार मोबाइलची चोरी करणाऱ्या धनराज राठोड (२०, रा. बाळकूम, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली.
बाळकूम येथील घरातून चार मोबाइलची चोरी करणाऱ्यास अटक
ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कामगिरीपाच मोबाइल हस्तगत