लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:16 IST2021-02-18T05:16:12+5:302021-02-18T05:16:12+5:30

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शोयेब खान (२५, रा. हाजुरी, वागळे इस्टेट, ठाणे) ...

Arrested for sexually abusing a young woman on the pretext of marriage | लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शोयेब खान (२५, रा. हाजुरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत दिली आहे.

वागळे इस्टेट, गौतमनगर येथील ही पीडित तरुणीशी शोयेब याने लग्नाचे आश्वासन देऊन जवळीक वाढविली. याचाच फायदा घेऊन त्याच्या गौतमनगर येथील राहत्या घरी तसेच कशेळी, भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ऑक्टोबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०२० या काळात सुरू होता. वारंवार होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून तिने अखेर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने आरोपी खान याला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.

Web Title: Arrested for sexually abusing a young woman on the pretext of marriage