शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:56 PM

महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणा-या प्रथमेश महादेव बाबर (१९, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

ठाणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणा-या प्रथमेश महादेव बाबर (१९, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पीडिता १८ वर्षांची असून ती आणि आरोपी प्रथमेश हे दोघेही ठाण्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. ती घोडबंदर रोड भागात तर तो मानपाड्यातील शिवाजीनगर भागात वास्तव्याला आहे. दोघांमध्येही चांगली मैत्री आहे. तिचा फायदा घेऊन जुलै २०१८ ते ६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. घरातील मंडळी बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरी वेगवेगळ्या बहाण्याने यायचा. त्याच वेळी त्याने हे कृत्य केले. आईवडील रागावतील म्हणून तिने घरातही हा प्रकार सांगितला नाही. मात्र, आठवड्यापूर्वी तिला पोटात त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यावेळी आपल्याच मित्राने अत्याचार केल्याची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. तिच्या पालकांनी आणि तिने या प्रकरणी २२ आॅक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स :Arrestअटक