मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:56 IST2018-10-23T23:56:50+5:302018-10-23T23:56:59+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणा-या प्रथमेश महादेव बाबर (१९, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Arrested Girlfriend | मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

ठाणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणा-या प्रथमेश महादेव बाबर (१९, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडिता १८ वर्षांची असून ती आणि आरोपी प्रथमेश हे दोघेही ठाण्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. ती घोडबंदर रोड भागात तर तो मानपाड्यातील शिवाजीनगर भागात वास्तव्याला आहे. दोघांमध्येही चांगली मैत्री आहे. तिचा फायदा घेऊन जुलै २०१८ ते ६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. घरातील मंडळी बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरी वेगवेगळ्या बहाण्याने यायचा. त्याच वेळी त्याने हे कृत्य केले. आईवडील रागावतील म्हणून तिने घरातही हा प्रकार सांगितला नाही. मात्र, आठवड्यापूर्वी तिला पोटात त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यावेळी आपल्याच मित्राने अत्याचार केल्याची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. तिच्या पालकांनी आणि तिने या प्रकरणी २२ आॅक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: Arrested Girlfriend

टॅग्स :Arrestअटक