अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 12, 2024 04:33 IST2024-10-12T04:32:54+5:302024-10-12T04:33:20+5:30

ठाण्यातील घटनेने व्यापाऱ्यांमध्ये संताप

arrested for molesting a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : एका १२ वर्षीय शाळकरी मुलीचा इमारतीच्या जिन्यामध्ये विनयभंग करणाऱ्या सचिन यादव या 
५२ वर्षीय आरोपीला अटक केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली. या घटनेने भंडारआळी परिसरातील राहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

भंडारआळी परिसरातील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा  यादव याने एका इमारतीच्या जिन्यात विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोकसो कायद्यातर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच यादव याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भंडारआळी परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे रहिवाशानी जाहीर केले आहे.

Web Title: arrested for molesting a minor girl