जादा परताव्याचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST2021-07-15T04:27:52+5:302021-07-15T04:27:52+5:30

ठाणे : गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी १३ लाखांचा गंडा घालणाऱ्या चेतन जीवराज दंड (४२) ...

Arrested for embezzling Rs 2 crore by showing lure of extra return | जादा परताव्याचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

जादा परताव्याचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

ठाणे : गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी १३ लाखांचा गंडा घालणाऱ्या चेतन जीवराज दंड (४२) याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. त्याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

चेतन याने २०१४ पासून देसर इन्व्हेस्टमेंट या बनावट नावाने कंपनीची जाहिरात फेसबुक, गुगलवर प्रसारित केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळेल, असेही त्याने या जाहिरातीत म्हटले होते. ती वाचून अनेकांनी त्याच्याकडे गुंतवणूकही केली. त्यानंतर काही महिने गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला. मात्र, नोव्हेंबर २०१९ पासून कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये चेतन याला ६ जुलै २०२१ रोजी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर गुंतवणूकदारांची दोन कोटी १३ लाख २५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे.

Web Title: Arrested for embezzling Rs 2 crore by showing lure of extra return