१३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: June 13, 2025 00:39 IST2025-06-13T00:38:43+5:302025-06-13T00:39:08+5:30

किसननगर भागात चाेरी प्रकरणातील आराेपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस अंमलदार निलेश शेडगे यांना मिळाली हाेती.

Arrested after 13 years, accused of forcibly stealing rickshaw driver's mobile arrested | १३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद

१३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद

जितेंद्र कालेकर 

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एका रिक्षाचालकाचा माेबाईल आणि काही राेकडची चाेरी करुन फरार झालेल्या विजय जाधव (वय २६, रा. ठाणे) याला १३ वर्षांनी अटक करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ च्या पथकाला यश आले आहे. त्याला श्रीनगर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

किसननगर भागात चाेरी प्रकरणातील आराेपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस अंमलदार निलेश शेडगे यांना मिळाली हाेती. त्याच आधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सलील भाेसले यांच्या मार्गदर्शनात शेडगे यांच्यासह अंमलदार सचिन बंडगर आणि मीनीनाथ शिकारे यांच्या पथकाने ११ जून २०२५ राेजी किसननगर भागातून जाधव याला ताब्यात घेतले.

चाैकशीत ८ ऑगस्ट २०१२ राेजी रात्री १० वाजता रिक्षाचालक महेश बुधकर यांचा माेबाईल आणि ३५० रुपयांच्या राेकडची चाेरी केल्याची बाब समाेर आली. या घटनेनंतर ताे पसार झाला हाेता. याप्रकरणी श्रीनगर पाेलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध् जबरी चाेरीचा गुन्हा दाखल झाला हाेता. त्याला न्यायालयाने फरारी घाेषित केले हाेते. त्याला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Arrested after 13 years, accused of forcibly stealing rickshaw driver's mobile arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी