ठाण्यात नवी मुंबई बसचालकाला मारहाण करणा-या रिक्षाचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:19 IST2018-02-22T20:15:17+5:302018-02-22T20:19:38+5:30

ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी आणि दादागिरी कमी होण्याचे नाव घेत नाही. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या नवीमुंबई बसचालकाने रिक्षा चालकाने मारहाण केली आहे.

The arrest of the rickshaw driver in Thane in Navi Mumbai | ठाण्यात नवी मुंबई बसचालकाला मारहाण करणा-या रिक्षाचालकाला अटक

ठाण्यात नवी मुंबई बसचालकाला मारहाण करणा-या रिक्षाचालकाला अटक

ठळक मुद्दे वाद सोडणे पडले महागातएक दिवसाची पोलीस कोठडी

ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा रिक्षाचालकांची दादागिरी समोर आली आहे. सिडको बस स्टॉप येथे राबोडीतील रिक्षाचालकाने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बसचालकाला चक्क पटट्याने बुधवारी रात्री मारहाण केली. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली असून न्यायालयाने गुरुवारी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
दिघा येथे राहणारे बाळाजी भानुदास वाघे (३०) हे बुधवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास एनएमएमटी बस घेऊन ठाण्यातील सिडको येथील बस थांब्यावर आले. दरम्यान,त्याच परिसरात दुस-या एनएमएमटीच्या बस चालकासोबत रिक्षाचालक मोहम्मद शहा आलम मोहम्मद यासीम (२२) हा वाहन उभे करण्यावरून वाद घालत होता. तो वाद पाहून बसचालक बाळाजी वाघे हे सोडविण्यासाठी गेले होते. याचदरम्यान मोहम्मद याने त्या चालकाला सोडून वाघे यांच्याशी वाद घालून पट्ट्याने मारहाण केली. या मारहाणीत वाघे यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहम्मद याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुरुवारी पहाटे त्याला अटक केली. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने मोहम्मदला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.
 

Web Title: The arrest of the rickshaw driver in Thane in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.