पत्नीचा खून करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करणाऱ्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 04:50 AM2019-11-10T04:50:57+5:302019-11-10T04:51:01+5:30

आजारी असलेल्या पत्नीचा संपत्तीच्या वादातून गळा आवळून खून करून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव करणा-या पतीला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली.

Arrest husband arrested for murdering wife | पत्नीचा खून करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करणाऱ्या पतीस अटक

पत्नीचा खून करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करणाऱ्या पतीस अटक

Next

- जितेंद्र कालेकर 
ठाणे : आजारी असलेल्या पत्नीचा संपत्तीच्या वादातून गळा आवळून खून करून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव करणा-या पतीला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. तिच्या मृत्यूबद्दल संशय आल्यानंतर पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
ठाण्यातील रूपादेवीपाडा क्रमांक-२, साई मित्र मंडळ चाळ येथे शुक्ला कुटुंब राहते. आजारपणामुळे शारदा (५५) अंथरुणाला खिळून होती. त्यामुळे पती सोमनाथला (६५) तिची अनेक कामे करावी लागत होती. तो तिचा दुसरा पती असल्यामुळे पहिल्या पतीच्या मुलांना संपत्तीमध्ये वाटा मिळावा, असा तिने त्याच्याकडे हट्ट धरला होता. यातूनच दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरूहोता. याच वादातून त्याने ८ नोव्हेंबर रोजी तिचा गळा आवळला. त्यात गुदमरून तिचा मृत्यू झाला. तिला मिर्गीचाही त्रास असल्यामुळे ती नेहमीच चक्कर येऊन घरात पडत असे. हाच फायदा घेऊन त्याने ती चक्कर येऊन पडल्याचा बनाव केला.
तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकरण श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले. तिच्या गळ्याभोवती असलेला एक व्रण पोलिसांच्या निदर्शनास आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांच्या पथकाने याच व्रणामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिला. त्याच आधाराने पोलिसांनी त्याला ‘बोलते’ केल्यानंतर सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा करणाºया तिच्या पतीने अखेर तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमनाथने पत्नीची मिर्गीवरील औषधे बंद केली होती. याच कारणाने त्यानेही खुनाचा संशय व्यक्त केला.
>मुलाने दाखल केली तक्रार
तिचा मुलगा विशाल यादव (३५) यान सावत्र पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आई शारदा आणि सावत्र वडील सोमनाथ शुक्ला यांच्या नावावर असलेल्या दोन रूमपैकी आईच्या नावावर असलेली रूम ही विशालचा भाऊ अमोल यादव याच्या नावावर करावी. विशालच्या सावत्र वडीलांच्या यांच्या नावावर असलेली रूम ही सावत्र भाऊ अशोक शुक्ला याच्या नावावर करावी, असा आग्रह शारदा यांनी पतीकडे धरला होता. मात्र, या दोन्ही रूम सोमनाथ हा विशालचा सावत्र भाऊ अशोक शुक्लाच्या नावाने करणार होता.

Web Title: Arrest husband arrested for murdering wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.