शस्त्राच्या धाकाने तरुणीवर पाच नराधमांचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:29 IST2019-01-24T01:29:01+5:302019-01-24T01:29:06+5:30

भिवंडी-नाशिक मार्गावरील पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

Armed with the brutality, the tyranny of five innocent people | शस्त्राच्या धाकाने तरुणीवर पाच नराधमांचा अत्याचार

शस्त्राच्या धाकाने तरुणीवर पाच नराधमांचा अत्याचार

भिवंडी : भिवंडी-नाशिक मार्गावरील पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. घटनास्थळी आढळलेल्या मातीवरील पाऊलखुणांनी पोलिसांनी बुधवारी पाच जणांना बेड्या ठोकल्या.
शहरातील आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (२६) हा त्याच्या २० वर्षांच्या मैत्रिणीस घेऊन मंगळवारी सायंकाळी दुचाकीने पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेला होता. रात्री साडेनऊ वाजता ते दोघे घरी जाण्यास निघाले असता, त्यांना पाच जणांनी रस्त्यात अडवले.
त्यांनी सिकंदर याच्या डोक्याला गावठी कट्टा व चाकू लावला. त्यानंतर दोघांना पाइपलाइनच्या आडोशाला नेऊन तरुणीवर पाचही जणांनी अत्याचार केला. या घटनेने भयभीत झालेल्या इम्रानने आपल्या मैत्रिणीसोबत तालुका पोलीस ठाणे गाठले. दोघांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौघुले हे आपल्या पथकासह घटनास्थळी गेले. पाइपलाइनच्या मातीच्या भरावावर आढळलेल्या पाऊलखुणांचा पंचनामा करीत आरोपींचा परिसरात शोध घेतला.
चौकशीतून किशोर रघुनाथ लाखात (१९) याचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पाच जणांनी मिळून तरूणीवर अत्याचार केल्याचे कबूल केले. त्यानंतर गुरुनाथ गोपाल बारी (२३) यास येवई गावातून, हर्षद हिरामण मटले (१९) याला चाविंद्रा गावातून, तर अविनाश पुंडलिक जाधव (२४) आणि गणेश पवार (२०) या दोघांना शेलार गावातून अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
सुनावली आहे.

Web Title: Armed with the brutality, the tyranny of five innocent people