भाईंदर - मुंबई व मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर मुंबई महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वारावरील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्लॅब एका रिक्षावर (MH03 BN1013) कोसळल्याने रिक्षाच्या छताचे नुकसान झाले. मात्र यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. ही रिक्षा दहिसरहून ठाणे येथे निघाली असता गुरुवारी रात्री 6.30 वाजता घटना घडली. या घटनेवेळी रिक्षाचालक प्रवीण गोवर्धन घसपट व प्रवासी रिक्षात होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची नोंद दहिसर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी मुंबई महापालिकेला अपघातग्रस्त कमानीच्या स्लॅबच्या पहाणीची सूचना केली आहे.
दहिसर चेकनाक्यावरील कमानीचा स्लॅब रिक्षावर कोसळला, रिक्षाचं अतोनात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:05 IST