अतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये : डॉ. प्रकाश माळी यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 02:29 PM2020-07-02T14:29:25+5:302020-07-02T14:35:20+5:30

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा "ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा दुसरा दिवस पार पडला.

Apps that are not overused should not be downloaded: Dr. Prakash Mali's advice | अतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये : डॉ. प्रकाश माळी यांचा सल्ला

अतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये : डॉ. प्रकाश माळी यांचा सल्ला

Next
ठळक मुद्देअतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये : डॉ. प्रकाश माळी यांचा सल्लासतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम "ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" ( दिवसः- दुसरा )

ठाणे :  अलीकडेच शासनाने काही चिनी ॲप्सच्या वापरावर निर्बंध लादले, याकडे लक्ष वेधून अशा ॲप्सचा अनधिकृत वापर करणे, इतरांच्या बँक खाते, फेसबूक व इतर सोशल नेटवर्कींग साईटस् वरील माहितीचा अनधिकृतपणे वापर करणे हे सायबर गुन्हे असून यासंदर्भातील माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम- ४३ ए, ६६, ६९ सायबर लॉ कन्सल्टींग`चे संस्थापक निष्णात वकील डॉ. प्रशांत माळी यांनी विस्ताराने सांगितले.        
       `सायबर सुरक्षा` हा विषय `त्यांनी अगदी सखोलपणे मांडला. अतिवापर नसलेले ॲप्स शक्यतो डाऊनलोड करू नये, सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या विनामूल्य वायफायचा वापर टाळावा, असा सूचक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचबरोबर सोशल नेटवर्कींग साईटस् वर अश्लील चित्रफिती, छायाचित्रांचे प्रकाशन, संचारण व हस्तांतरण करणे हा गंभीर गुन्हा आहेच, परंतु अल्पवयीन मुला-मुलींसदर्भात हे गुन्हे अतिगंभीर ठरतात. यासंदर्भातील कलम- ६७, ६७ए, ६७बी यांची सविस्तर माहिती डॉ.माळी यांनी दिली. तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला न लपवता, वेळीच सायबर गुन्हे कक्षाकडे तक्रार केल्यास, अनेकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल हे निक्षून सांगितले. विनामूल्य डाऊनलोडींग ॲप्स, साईटस् चा वापर शक्यतो टाळावा असा सल्ला डॉ.माळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

         सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावर 'ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड.' ह्या  वेबिनारच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २७ हजार विद्यार्थ्यांनी या सात दिवसीय उपक्रमात सहभाग नोंदवला. भारताव्यतिरिक्त नायजेरिया, हॉंगकॉंग, कुवेत, नेपाळ, घाना, इथिओपिया, ओमान, यु.के, यु.एस संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया या राष्ट्रांतील विद्यार्थीही आवर्जून सहभागी झाले. दि. ०१ जुले रोजी, या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी  `सायबर सुरक्षा` व  `इंटरनेट बँकींग आणि पेमेंट ॲप्स` यांसारख्या अलिकडच्या काळातील अतिमहत्त्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण व्याख्यानांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला. त्यानंतर FI-ASK ( Forum of industry academic knowledge sharing ) या संस्थेचे सह- संस्थापक श्री. विकास पंडितराव यांनी `इंटरनेट बँकींग आणि पेमेंट ॲप्स` या विषयावर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड यांचे महत्त्व आणि उपयोग विस्तृतपणे सांगितले. अॉनलाईन व्यवहारासाठी आपले बँक खाते UPI ( unified payment interface ) शी कसे जोडावे, ई- वॕलेटस् चा वापर कसा करावा, पेमेंटस् ॲपच्या साहाय्याने मोबाईल रिचार्ज,  डिटीएच रिचार्ज कसा करावा, वीज तसेच इतर बीले अॉनलाईन कशी भरावी इ. अनेक अॉनलाईन व्यवहारासंदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन  केले. आजच्या कार्यक्रमाची सूत्रे पूर्णपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. अशारितीने दुसऱ्या दिवसाची दोन्ही सत्रे माहितीपूर्ण व्याख्यानांनी रंगली. दि. ३० जून ते ६ जूलै, २०२० या कालावधीत दररोज विविध अभ्यासविषयांवर आधारित या व्याख्यानमालेचा आस्वाद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या उपक्रमाची सांगता ६ जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत https://forms.gle/4my6C7naMaE3YXyDA या लिंकवर ईच्छूक विद्यार्थ्यांना  विनामूल्य नावनोंदणी करता येणार आहे.

Web Title: Apps that are not overused should not be downloaded: Dr. Prakash Mali's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.