ठामपा परिवहन पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:01+5:302021-08-28T04:45:01+5:30

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात ...

Appreciation of the meritorious children of the employees of Thampa Parivahan Patsanstha | ठामपा परिवहन पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतूक

ठामपा परिवहन पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतूक

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के उपस्थित होते.

गेल्या वर्षी कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ होऊ शकला नव्हता. त्यामुळे २०१९-२० मध्ये दहावी,बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महापौर दालनात गौरविण्यात आले यावेळी. दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आकांक्षा बोरसे, तन्मय बाविस्कर, श्रावणी बुगदाणी, वैष्णवी सांगळे, रिया देशमुख, तर बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रथमेश अमृतकर व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पूर्वजा विसपुते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष कैलास पवार, सचिव प्रतिभा घाडगे, संचालक किरण कदम, सतीश लादे, पतसंस्थेचे व्यवस्थापक दीपक दळवी उपस्थित होते.

Web Title: Appreciation of the meritorious children of the employees of Thampa Parivahan Patsanstha