शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

टोर्इंगबाबतचे नियम मुंबई प्रमाणे ठाण्यातही लागू करा - वाहतूक शाखेला मनसेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:22 IST

टोर्इंग वाहनांबाबत मुंबई वाहतूक विभागाने पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी ठाणे वाहतूक शाखेने देखील करावी अशी मागणी मनविसेने केली आहे.

ठळक मुद्देमनविसेच्या वतीने वाहतूक शाखेला निवेदन टोर्इंगबाबतचे नियम मुंबई प्रमाणे ठाण्यातही लागू करा - मनसेहे आदेश नागरिक व पोलीस यांच्या दोघांच्या हिताचे - मनसे

ठाणे: नो पार्कींग मधील गाडी उचल्यांवरून नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये वारंवार वादविवाद होत असल्याचा घटना घडत आहेत. हे वाद टाळण्यासाठी मुंबई वाहतूक शाखेच्यावतीने नागरिक व पोलीस यांच्या हिताचे आदेश पारित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी ठाणे वाहतूक शाखेने देखील करावी अशी मागणी मनविसेच्या वतीने वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.         टोईंगबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई वाहतूक विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला व तसे आदेशही पारित केले आहेत. यामध्ये टोर्इंग वाहनांवर सहाय्यक पोलीस उप निरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, नो पार्किंग मधील उभ्या असलेल्या वाहनांमध्ये वाहन चालक किंवा इतर कोणताही व्यक्ती बसलेला असेल तर ते वाहन टो करण्यात येऊ नये, टोर्इंग वाहनांवरील पोलीस कर्मचाºयांकडे चलन मशीन व वॉकीटॉकी देण्यात यावी, टोर्इंगची कारवाई सुरु करण्यापूर्वी तेथे मेगाफोनद्वारे आवाहन करावे व जर कोणी तेथे आले नाही तरच पुढे टोर्इंगची कारवाई करावी, अवैधरित्या उभ्या आलेल्या वाहनांचे टोर्इंग सुरु केल्यावर वाहतूक चौकीला वाहन पोहचण्यापूर्वी मध्ये जर संबंधित वाहनाचे मालक/चालक जर ई चलनाद्वारे तडजोड रक्कम भरण्यास तयार असेल तर तडजोड रक्कम स्वीकारून वाहन तेथेच सोडावे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे असेल व ते वाहन टो करण्यापूर्वी जर कोणी वाहनचालक किंवा इतर व्यक्ती तेथे आल्यास फक्त नो पार्किंगची तडजोड रक्कम स्वीकारून वाहन सोडण्यात यावे, टोर्इंग चार्ज घेण्यात येऊ नये, टोर्इंग वाहनावरील खाजगी कर्मचारी वाहनचालक किंवा इतरांशी उध्दट वर्तन करणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आदेश मुंबई वाहतूक शाखेने २३ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबई पारित केले आहेत. हे आदेश नागरिक व पोलीस यांच्या दोघांच्या हिताचे असून टोर्इंग वरून होणारे वाद कमी होण्याचा दृष्टीने चांगले पाऊल आहे तरी मुंबई मध्ये असे आदेश पारित होत असतील तर मुंबईच्या धर्तीवर ठाणे वाहतूक शाखेने देखील या आदेशाची अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन मनसेने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब गीते यांना देण्यात आले यावेळी मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभाग ठाणे शहर अध्यक्ष अरु ण घोसाळकर, नवीन कोळी, तन्मय कोळी, ओमकार महाडिक, सागर कदम व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtraffic policeवाहतूक पोलीस