यापुढेही अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्रपणे सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 02:14 PM2021-09-01T14:14:14+5:302021-09-01T14:14:47+5:30

महापालिका अतिक्रमण उपायुक्तांचा अनाधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांना इशारा. दोन दिवसापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला होता.

Anti-encroachment action will continue in Thane | यापुढेही अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्रपणे सुरुच राहणार

यापुढेही अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्रपणे सुरुच राहणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर झालेला हल्ला हा केवळ त्यांच्यावर नसुन हा संपूर्ण प्रशासनावर हल्ला होता. त्यामुळे काम बंद आंदोलन तर केले आहेच, शिवाय यापुढे शहरातील अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि फेरीवाल्यांच्या विरोधात सुरु असलेली कारवाई अधिक तीव्रपणो केली जाईल असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिला.

 दोन दिवसापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर बुधवारी या हल्याच्या निषेर्धात एमएमआर रिझनमधील ४० हजार कर्मचारी अधिका:यांनी काम आंदोलन केले. ठाणे  महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा:यांनी देखील काम बंद आंदोलन करीत या घटनेची तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला त्यांच्यावर नसून संपूर्ण प्रशासनावर असल्याचे सांगत अशा घटना यापुढे घडू नयेत या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त वाघमळे यांनी दिली. अशा भ्याड हल्याला आम्ही जुमणार नसून यापुढे जाऊन शहरातील अनाधिकृत बांधकामे असतील किंवा अनाधिकृत फेरीवाले असतील त्यांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्रपणो केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

  ठाण्यात सहाय्यक आयुक्त यांच्यावर अनिधकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करीत असतांना, झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तसेच एका व्यक्तीवर कारवाई करून चालणार नाही तर, अशा प्रवृत्तींना पायबंद घातला पाहिजे. तर, कायद्यामध्ये देखील सुधारणा करण्यात यावी अशी मागणी अतिरिक्त आयुक्त तथा मुख्यकार्यकरी अधिकारी संघटनेचे सदस्य ओमप्रकाश दिवटे यांनी हल्य्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाच्यावेळी केली. तर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अशाच पध्दतीने काम बंद आंदोलन करुन काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पहिल्या टप्यात जिल्हाधिकरी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्नी, गृहमंत्नी आणि पालकमंत्री यांची देखील भेट घेणार आहे. या कामबंद आंदोलनाच्या माध्यामतून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या हाच त्यामागचा उद्देश आहे. (रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी, ठाणे)

Web Title: Anti-encroachment action will continue in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.