शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

ठाणे महापालिका कामगारांना १५ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:20 PM

ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे.

ठळक मुद्देसहाव्या वेतन आयोगाचाही तिढा सुटणारपरिवहनच्या कामगारांनाही सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे - ठाणे महापालिकेच्या कामगाराचा सानुग्रह अनुदानाचा तिढा सुटला असून यावर्षी त्यांना १५ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. तर कंत्राटी कामगारांना सानुग्रह म्हणून अतिरिक्त एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे १३ कोटींचा बोजा पाडणार आहे. महापालिकेत आतपर्यंत हे सर्वात जास्तीचे सानुग्रह अनुदान असल्याचे म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी सांगितले. ठाणे महापालिकेचे १० हजार कायस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे.                             ठाणे पालिकेकच्या विविध विभागात स्थायी, अस्थायी, ठोक पगारावरील कर्मचारी, अनुकंपा वारसा कर्मचारी अशा १० हजार कर्मचाºयांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाचा निर्णय सोमवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियन अध्यक्ष रवी राव यांच्या बैठकीत घेण्यात आला. मागील वर्षी झालेल्या वाटाघाटीत पालिका कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा पालिकेच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने कामगारांना २० हजाराचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महिन्यापूर्वीच म्युनिसिपल लेबर युनियनने केली पालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र २० हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मान्य न करता कायस्वरूपी कामगारांना १५ हजार १०० तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांनी एका महिन्यात जेवढी हजेरी लावली आहे तेवढा पगार देण्यात येणार आहे.              ठाणे महानगर पालिकेत कायस्वरूपी कर्मचाºयांची संख्या ५ हजार ८३ एवढी आहे. अनुकंपा वारसा तत्वावरील कर्मचारी २ हजार ५८, ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी १ हजार ५१, शिक्षण विभगातील ठोक पगारावर कर्मचारी २३ असे एकूण ८ हजार ४६७ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ७५० रु पयांची वाढ सानुग्रह अनुदानात करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यावर्षी देखील पालिका कर्मचारी यांच्या सोबतच परिवहन सेवेच्या २ हजार २१७ कर्मचाºयांनी देखील यंदा २० हजाराच्या सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र त्यांनाही १५ हजार १०० सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे.सहावा वेतन आयोगाचा तिढा लवकरच सुटणार -ठाणे महापालिकेच्या कर्मचाºयांना सहावा वेतन अयोग लागू करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये सहाव्या वेतन आयोगावर देखील चर्चा झाली असून डिसेंबर अखेर हा तिढा सोडवणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याचे रवी राव यांनी सांगितले. सहावा वेतन अयोग्य लागू झाल्यास पालिकेवर १५ ते २०कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त