शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बुलेट ट्रेन,मल्टीमोडल कॉरिडोरविरोधात संताप, पालघर जिल्ह्यातील लोण आता ठाण्यातही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:32 AM

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडोर म्हणजे बहुउपयुक्त महामार्ग आदींसाठी शेती, वनजमीन आदींचे संपादन काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे.

- सुरेश लोखंडेठाणे - सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडोर म्हणजे बहुउपयुक्त महामार्ग आदींसाठी शेती, वनजमीन आदींचे संपादन काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. पालघरमधील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी याविरोधात आंदोलन छेडले. त्याचे लोण आता ठाणे जिल्ह्यातही पसरत आहे. शीळ, डायघर आणि कल्याणच्या २७ गावांतील शेतकरी बुलेट ट्रेन, कॉरिडोरच्या विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत.एमएमआरडीएच्या विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरच्या नवघर ते चिरनेर या पहिल्या टप्प्यातील कॉरिडोरसह बुलेट ट्रेनसाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी लागू केलेला दर अजूनही शेतकºयांना सांगितला जात नाही. तो आधी कळवण्यात यावा. भूमी अधिग्रहणानुसार शहरी भागात अडीचपट व ग्रामीण भागात पाचपट रक्कम शेतकºयांना मिळावी, डिमार्केशनच्या बाजूच्या जागेचादेखील शेतकºयांना मोबदला मिळावा आदी विविध प्रश्नांवर शासनाकडून ऊहापोह न होता केवळ जमिनी घेण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संतापलेल्या शेतकºयांकडून लवकरच पुन्हा आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार, चाचपणी केली असता आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार संतोष केणी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. जिल्हाधिका-यांची पुन्हा भेट घेऊन शेतकºयांचे आंदोलन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे केणी म्हणाले.बुलेट ट्रेनसाठी १९ हेक्टर शेतजमिनीचे संपादन आणि मोजमाप करण्याचे काम बहुतांश ठिकाणी झाले. यामध्ये २५० शेतक-यांच्या जमिनीचा समावेश आहे. यात ठाणे तालुक्यातील नऊ गावांच्या शेतकºयांच्या शेतजमिनीचे संपादन हाती घेतले आहे. पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेने बहुतांश ठिकाणी काम झाले. पहिल्या टप्प्यातील शीळ, डावले, पडले, आगासन, बेतवडे, लहानी देसाई, मोठी देसाई आदी गावांच्या शेतकºयांच्या शेतजमिनी व सरकारी जमिनींचे मोजमाप पूर्णत्वास येत आहे. मात्र, या जमिनी कोणत्या दराने संपादित केल्या जात आहेत, हे प्रशासनाकडून सांगितले जात नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप आहे.बीकेसीतून ठाण्यात येणारी बुलेट ट्रेन ठाणे खाडीमार्गे कोपरखैरणे, महापे, शीळ असा वळसा घेत आगासन, म्हातार्डेमार्गे भिवंडीहून पालघरला जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान ताशी ३२० किमीच्या वेगाने धावणा-या बुलेट ट्रेनच्या विरोधाची धार कमी झालेली नाही. ठाणे तालुक्यातील सुमारे १९ हेक्टर शेतजमीन यासाठी लागणार आहे.ठाण्याच्या खाडीत ४० मीटर खोल बोगद्यातून ही बुलेट ट्रेन जाणार आहे. ठाणे परिसरातील ठाणे खाडी, कोपरखैरणे, सावली, घणसोली, महापे, अडवली, भुतवली अशी शीळपर्यंत भुयारी मार्गाने ती धावणार आहे. शीळ येथून ती डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे, म्हातार्डी अशा एलिव्हेटेड (म्हणजे उड्डाण) मार्गाने जाणार आहे. यानंतर, ही बुलेट ट्रेन भिवंडीच्या उसरघर, भारोडी, अंजूर, सारंग, सुरई, मानखोली, दापोडे, दिवे, अंजूर, केशळी, पुरने, काल्हेर, कोपर, केवानी, खारबाव, मालोडी, पायगाव, पोये, दिवे, वसई खाडीमार्गे पुढे पालघर जिल्ह्यातून जाईल.बुलेट ट्रेनसाठी मुंबई ते अहमदाबाद असा ५०८.१० किलोमीटरचा मार्ग असून त्यापैकी ठाणे जिल्ह्यातून ३९.६६ किलोमीटर मार्ग जाणार आहे. या मार्गाची रु ंदी १७.५ मीटर इतकीच राहणार असून बीकेसीपासून ठाणे तालुक्यातील शीळपर्यंतचा २१ किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. त्यापुढे ४८७ किलोमीटर म्हणजे अहमदाबादपर्यंत ती एलिव्हेटेड- उड्डाण मार्गावरून धावणार आहे. हा मार्ग जमिनीपासून १० ते १५ मीटर उंच असेल. दोन खांबांतील अंतरही ३० मीटर इतके ठेवण्याचे नियोजन आहे.या ट्रेनप्रमाणेच विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरच्या ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ स्क्वेअर मीटर जागा लागत आहे. ठाणे जिल्ह्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून हा ‘नवघर ते चिरनेर’ कॉरिडोर मार्ग जात आहे. यासाठीच्या संपादित जागेवरून मेट्रोसह दोन्ही बाजूंनी मोठ्या बहुउपयुक्त महामार्गांसह नॅचरल गॅसची पाइपलाइन जाणार आहे. यासाठी गेल्यावर्षी डोंबिवलीतदेखील जनसुनावणी झाली आहे. या मल्टीमोडल कॉरिडोरसाठी संपादित होणाºया जमिनीपैकी ठाणे जिल्ह्यातील २७ गावांच्या शेतकºयांची ३२ लाख ५३ हजार ३९८.१३ स्क्वेअर मीटर शेतजमीन बाधित होत आहे.भिवंडी तालुक्याच्या १३ गावांच्या शेतक-यांची २०२६५१७.४६ स्क्वेअर मीटर शेतजमिनीसह ठाण्यातील एका गावातील शेतक-यांची ३२९६६.८७ स्क्वेअर मीटर शेतजमीन, कल्याणच्या आठ गावांची ७०२६४०.४९ आणि अंबरनाथच्या पाच गावांतील शेतक-यांची ४९१२७३.३१ स्क्वेअर मीटर शेतजमीन या मल्टीमोडल कॉरिडोरसाठी लागणार आहे. याशिवाय, शासकीय मालकीची तीन लाख ५६ हजार ५३०.५३ स्क्वेअर मीटर जमीन, खाजण म्हणजे मिठागराची १३ हजार ३५१.८६ स्क्वेअर मीटर आणि रेल्वे व इतर विभागांची एक हजार ४८१.२२ स्क्वेअर मीटर जागा या कॉरिडोरसाठी लागत आहे.पालघरसह रायगडची बाधित जमीनपालघर जिल्ह्यातील वसई येथील सात गावांमधील शेतकºयांची २५६२८३.४९ स्क्वेअर मीटर शेतजमीन, शासकीय ४०४१४.५६, वनविभागाची ९७५२३.०७, खाजण २७७२.३५ आणि रेल्वेसह इतर विभागांची ६३९४.१७ स्क्ेवअर मीटर जमीन बाधितहोत आहे.रायगड जिल्ह्यातील पनवेलची ४३ गावे, उरणची ११ गावे, पेणची २१ आणि अलिबागची १९ आदी ९४ गावांच्या शेतकºयांची ७६१८२७१.५१ स्क्ेवअर मीटर शेतजमीन या प्रकल्पासाठी लागत आहे.याशिवाय, या जिल्ह्यातील शासकीय मालकीची १०१४१६२.३७ स्क्वेअर मीटर, वनविभागाची ५६८२४६.७७, खार जमीन ३५३४७.०७ आणि रेल्वेसह अन्य विभागांच्या मालकीची २१७५८ स्क्वेअर मीटर जमीन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. ंजेएनपीटी बंदराला सर्वाधिक फायदाविरार ते अलिबाग या कॉरिडोरमुळे पालघर-ठाणे-रायगड हे तिन्ही जिल्हे जवळ येणार असून याचा सर्वाधिक फायदा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटी बंदराला होणार आहे. येथील कंटेनर वाहतूक शीघ्रगतीने होऊन पश्चिम किनारपट्टीसह ठाणे आणि भिवंडीतील गोदामपट्ट्यात आणणे सोपे होणार आहे.12975 कोटींचा प्रकल्प२एमएमआरडीएने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला, तेव्हा तो १२९७५ कोटी रुपयांचा होता. यात पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर हा ७९ किमीचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित असून त्यावर ९३२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दुसºया टप्प्यातील चिरनेर ते अलिबाग ४७ किमी मार्गाच्या बांधणीसाठी ३६४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनpalgharपालघरVasai Virarवसई विरारthaneठाणे