अंगणवाड्यांना ‘आॅनलाइन’ सक्ती

By Admin | Updated: October 13, 2016 03:49 IST2016-10-13T03:49:13+5:302016-10-13T03:49:13+5:30

अंगणवाडी सेविकांना इंग्रजीसह संगणकाचे पुरेसे ज्ञान नसतांनाही त्यांना सायबर कॅफेतून अंगणवाडीतील उपस्थित विद्यार्थ्यांची इंटरनेटच्या

Anganwadi forced 'online' | अंगणवाड्यांना ‘आॅनलाइन’ सक्ती

अंगणवाड्यांना ‘आॅनलाइन’ सक्ती

ठाणे : अंगणवाडी सेविकांना इंग्रजीसह संगणकाचे पुरेसे ज्ञान नसतांनाही त्यांना सायबर कॅफेतून अंगणवाडीतील उपस्थित विद्यार्थ्यांची इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन नोंद करण्याची सक्ती केली जात आहे. त्यासाठी लागणारा आर्थिक भुर्दंड ही त्याना सोसावा लागत आहे. यामुळे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्यांनी याविरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी केंद्रात बालकांना शिकवणाऱ्या बहुतांशी सेविका अल्प शिक्षित आहेत. इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान नाही. संगणकाच्या तांत्रिक ज्ञानाचा काही संबंध नसतानाही अंगणवाडीतील उपस्थित बालकांची नोंद ‘एमआयएस’च्या लाईन लिस्टिंग सॉफ्टवेअरव्दारे करण्याची सक्ती केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील व सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी केला आहे.
खाजगी सायबरकॅफेत जावून या बालकांची केंद्रनिहाय आॅनलाईन माहिती भरण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी कमीत कमी येणारा ३० रूपये खर्चही सेविकानाच करावा लागत आहे. तुटपूंजे मानधन तेदेखील वेळेवर दिले जात नाही. याशिवाय आॅनलाईन येणारा खर्च तर त्यांच्यासाठी मोठाच आहे. ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील सेविकाना जवळच्या शहरात जाऊन हे काम करावे लागत आहे. हे काम जर मातृभाषेत असेल व त्यासाठी येणारा खर्च मिळत असेल तरच सेविका ही कामे करतील. अन्यथा त्यांच्यावर होणारा हा अन्याय वेळीच दूर करावा, यासाठी साकडे घालण्यात आले आहे.

Web Title: Anganwadi forced 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.