Anandanagar check in Kopri arrested one accused for knife | कोपरीतील आनंदनगर चेक नाक्यावर चाकू बाळगणाऱ्यास अटक

संचारबंदीबरोबरच मनाई आदेशाचाही भंग

ठळक मुद्देसंचारबंदीबरोबरच मनाई आदेशाचाही भंगकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्यात सुरु असलेल्या संचारबंदीचा भंग करीत बेकायदेशीरपणे चाकू बाळगून रस्त्यावर फिरणा-या फिरोज नवाज खान उर्फ चिकना (३२, रा. मुंब्रा, ठाणे) याला रविवारी दुपारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडे पाच इंची चाकूही हस्तगत केला आहे.
संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केलेला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारही घराबाहेर न पडल्यामुळे गुन्हेगारीचेही लॉकडाऊन झाल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. मात्र, २९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावर आनंदनगर चेक नाका याठिकाणी संशयास्पदरित्या फिरणा-या फिरोजला नाकाबंदीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर, पोलीस निरीक्षक दत्ता गावडे आणि पोलीस हवालदार सुकलेश्वर बेलदार यांच्या पथकाने पकडले. चौकशीमध्ये त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे हा बटन चाकू मिळाला. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग केल्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Anandanagar check in Kopri arrested one accused for knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.