शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आनंद परांजपेंचे पद जाणार, शहराध्यक्षपदासाठी राष्टÑवादीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 6:50 AM

ठाणे शहर राष्टÑवादीमध्ये येत्या दोन आठवड्यांत अदलाबदलीचे वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे शहराध्यक्षपदाची निवडणूक येत्या दोन आठवड्यांत लागणार असल्याने त्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदही बदलण्यासाठी हालाचालींना जोर आला आहे. त्यामुळे या दोनही पदांसाठी आता राष्टÑवादीत अनेक इच्छुकांनी लगबग सुरूकेली आहे.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे शहर राष्टÑवादीमध्ये येत्या दोन आठवड्यांत अदलाबदलीचे वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे शहराध्यक्षपदाची निवडणूक येत्या दोन आठवड्यांत लागणार असल्याने त्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदही बदलण्यासाठी हालाचालींना जोर आला आहे. त्यामुळे या दोनही पदांसाठी आता राष्टÑवादीत अनेक इच्छुकांनी लगबग सुरूकेली आहे.वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यादृष्टीने हे बदल केले जात असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. परंतु, महापालिका निवडणुकीच्या काळात हे बदल अपेक्षित असताना आता वरच्या निवडणुकांसाठी हे बदल कशासाठी, अशी शंकेची पालही चुकचुकली जाऊ लागली आहे. केवळ आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठीच कळवा-मुंब्य्राचे राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी हे बदल करण्याचे निश्चित केल्याचेही बोलले जात आहे.सध्या राष्टÑवादीचे शहराध्यक्षपद हे आनंद परांजपे यांच्याकडे आहे. त्यांची निवड २३ जून २०१६ रोजी झाली होती. येत्या काळात ते लोकसभेसाठी तयारी करणार असल्याने त्यांच्या जागी नवा चेहरा देण्याचा राष्टÑवादीचा विचार आहे. परांजपे यांनी आपल्या कारकिर्दीत राष्टÑवादी जिवंत ठेवली. त्यांनी अनेक आंदोलने आणि सत्ताधारी शिवसेनेशी दोन हात करून राष्टÑवादीची ठाण्यातील ताकद दाखवून दिली. आता कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांच्या जागी नव्या चेहºयाला संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार, दोन आठवड्यांत शहराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत पुन्हा आनंद परांजपे यांचे नाव आघाडीवर आले आहे. त्यांच्या खालोखाल नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुहास देसाई यांचीही नावे चर्चेत आहेत. मागील वेळेसच देसाई यांचे नाव अंतिम होऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले होते. परंतु, ऐनवेळेस त्यांचे नाव कापून शहराध्यक्षपदाची धुरा परांजपे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.परंतु, मनधरणी करून त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्या जागी नव्या चेहºयाला संधी दिली जाणार आहे. त्यासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये पुन्हा प्रमिला केणी यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. मागील वेळेसच त्यांचे नावदेखील अंतिम झाले होते. परंतु, पाटील यांची मनधरणी करण्यासाठी केणी यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे आतासुद्धा इच्छुकांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आव्हाडांनी मुंब्य्रातील नगरसेवकाला याठिकाणी संधी देण्याचे निश्चित केल्याची माहिती राष्टÑवादीच्या खास सूत्रांनी दिली. त्यानुसार, मुंब्य्रातील आक्रमक नेतृत्व असणारे शानू पठाण आणि महिला नगरसेविका अशरीन राऊत यांचे नाव आघाडीवर आहे.आनंद परांजपे यांची वर्णी कुठे लागणारमागील दोन वर्षे तेही देशासह राज्यात आणि ठाण्यातही भाजपाची लहर असताना आनंद परांजपे यांनी शहर राष्टÑवादी जिवंत ठेवली होती. त्यांनी मागील दोन वर्षे सतत विविध प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून राष्टÑवादीला एक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता त्यांचीही गच्छंती होणार, हे आता अटळ मानले जात असून त्यांची वर्णी आता कुठे लावली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.विरोधी पक्षनेतेपदाच्या बदल्यात शहराध्यक्षपदविरोधी पक्षनेतेपदी अडीच वर्षांचा वायदा केला असतानादेखील अवघ्या एका वर्षातच मिलिंद पाटील यांची या पदावरून उचलबांगडी केली जाणार आहे. या बदल्यात त्यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ घातली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी आस लावून बसणाºया अनेकांना हा धक्काच म्हणावा लागणार आहे.विरोधी पक्षनेतेही बदलणारसध्या राष्टÑवादीतर्फे विरोधी पक्षनेतेपदी मिलिंद पाटील हे आहेत. परंतु, त्यांचीदेखील येत्या काही दिवसांत उचलबांगडी होणार असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. आधीच महापालिका निवडणूक झाल्यानंतर ते नाराज होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे