शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाण्यात आनंदी आनंद गडे; अंतर्गत मेट्रो, जलवाहतुकीला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:18 AM

लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण निर्मितीचा संकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून सोडला.

ठाणे : लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण निर्मितीचा संकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून सोडला. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प त्यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांना सादर केला.विद्यार्थ्यांची संख्या घटणाऱ्या शाळा खाजगी संस्थांना चालवायला देणे, वाहतूककोंडी फोडणे, क्लस्टर योजना, पीआरटीएसअंतर्गत जलवाहतूक, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प, चौपाट्या-तलावांचा विकास, पार्किंग सुविधा आदी महत्त्वाच्या योजनांचा समावेश असलेला, करवाढ- दरवाढ नसलेला ३६९५.१३ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी २०१७-१८ चा ३०४७.१९ कोटींचा अर्थसंकल्पही सादर केला.अर्थसंकल्पात प्रथमच विशेष प्रकल्पांतर्गत लोकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यावर भर दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी १०० कोटींची तरतूद आहे. पालिकेने जगभरातील विविध शहरांचा अभ्यास करून बेस्ट पॅ्रक्टिसवर आधारित काही महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत.ठाणे शहरांतर्गत मेट्रो, अंतर्गत जलवाहतुकीचा तपशील देतानाच वडाळा ते कासारवडवली या मेट्रोच्या कामाला मे अखेरपर्यंत सुरूवात होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.- सविस्तर तपशील/३ग्लोबल चॅलेंज फंडशहरातील नवउद्योजकांना निधी उभारण्यासाठी हा फंड निर्माण करण्यात येणार असून यामध्ये नावीण्यपूर्ण कल्पना असणाºया सर्वोत्तम प्रस्तावांना निधी मिळवून देण्यासाठी पालिका मदत करणार आहे. यासाठी पाच कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.सार्वजनिक व खाजगी शाळा भागीदारीखाजगी शाळा आणि महापालिकेच्या शाळांमध्ये असणारी बलस्थाने शोधून त्याचा उपयोग करून शालेय मुलांना भेडसावणाºया विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी भागीदारीत शाळा प्रकल्प राबवण्यासाठी १ कोटींची तरतूद.रेडिओ स्कूलरेडिओ संकल्पनेद्वारे मुलांचा विकास करण्यासाठी रेडिओ विद्यालय संकल्पना राबवण्यासाठी ३० लाखांची तरतूदसमुपदेशन केंद्र नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या मनात असलेले नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी एक कोटी.धूरविरहित केंद्र महापालिका हद्दीत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून स्मोक फ्री टॉवर उभारण्यात येणार असून यासाठी पाच कोटी.समाजविकास आणि नागरिक केंद्रित सुधारणाविविध समस्यांचे निराकरण करून केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांच्या समुदायाचा विकास करण्यासाठी नागरिक केंद्रित व्यवस्था स्थापनेसाठी आठ कोटींची तरतूदजीआयएस सर्व्हेजीआयएस प्रणालीद्वारे महापालिकेच्या विविध करांसाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करून नागरिकांना कर भरण्यास सुलभता यावी, यासाठी सर्व मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे करण्यासाठी १५ कोटींची तरतूदअनुकूल ट्रॅफिक व्यवस्थापन यंत्रणावाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करून प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी आठ कोटींची तरतूद.डिजिटल मेसेजिंग सिस्टीमसार्वजनिक हिताच्या दृष्टीने नागरिकांपर्यंत विविध सूचना पोहोचवण्यासाठी या यंत्रणेची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी तीन कोटी.आरोग्यसुविधा : क्षयरोग दत्तक योजना - महापालिका हद्दीत ३३०० क्षयरोग रुग्ण उपचार घेत आहेत. एका रुग्णाच्या कुटुंबात एकूण पाच व्यक्ती गृहीत धरून दत्तक योजना राबवण्याचा पालिकेचा मानस असून त्यानुसार या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची वेळोवेळी तपासणी करणे, भेटी देऊन रुग्णास अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना प्रतिवर्ष क्षयरोग या आजाराचा संसर्ग झाला आहे अथवा नाही, त्यानुसार आवश्यक त्या तपासण्या करण्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये मासिक खर्च देणे आदींच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी दोन कोटींची तरतूद प्रस्तावित.कुटुंब सौख्य योजनागृहकलह मिटवण्यासाठी एका व्यक्तीसाठी सहा समुपदेशन बैठका घ्याव्या लागतात. प्रतिबैठकीसाठी ५०० या प्रमाणे ३०० व्यक्तींसाठी वार्षिक नऊ लाखसर्वांसाठीकौशल्य विकासव्होकेशनल ट्रेनिंग सेंटरद्वारे कुशल कामगार व उद्योजक यांची निर्मिती करण्यासाठी २५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.रे आॅफ लाइटकर्करोगग्रस्त रुग्णांसाठी विविध सुविधा असणाºया वाहनांद्वारे वैद्यकीय सेवा पुरवल्या जाणार असून त्यासाठी एक कोटीक्षयरोग नियंत्रण वाहनविविध वैद्यकीय सुविधा असणाºया वाहनांद्वारे, क्षयरोगग्रस्त रुग्णांना सेवा पुरवल्या जाणार असून त्यासाठी दोन कोटी.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका