शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जादूटाेण्याच्या संशयावरून वृद्धाला नेले विस्तवावरून, मुरबाड तालुक्याच्या करवळे गावातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 07:05 IST

जादूटोणा करतो, असा आराेप करून भावार्थे  यांना मंगळवारी पहाटे अडीच वाजता विस्तवावर जबरदस्तीने चालायला भाग पाडले. मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे, काळूराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसू भावार्थे आणि गावातील तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

ठाणे : जादूटाेणा करताे, असा आराेप करून मुरबाड तालुक्यातील करवळे येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण भावार्थे (६०) यांना विस्तवावरून चालण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचे पाय भाजल्याने त्यांना वेदना हाेत आहेत. त्यांची मुलगी सविता माेरे हिला  कल्याण येथील अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ देऊन पाेलिसांत गुन्हा दाखल केला आहे, असे अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशाेक चव्हाण यांनी सांगितले. 

जादूटोणा करतो, असा आराेप करून भावार्थे  यांना मंगळवारी पहाटे अडीच वाजता विस्तवावर जबरदस्तीने चालायला भाग पाडले. मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे, काळूराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसू भावार्थे आणि गावातील तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास मुरबाडचे पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर करत आहेत.

या घटनेचा व्हिडीओ अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांच्याकडे आला. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे अंनिसच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्याकडे तक्रार पाठवली. शिंदे यांनी पीडित वृद्धाच्या विधवा मुलीशी संपर्क साधून तिला धीर दिला. 

मोलमजुरी करून उदरनिर्वाह- लक्ष्मण भावार्थे हे आपली विधवा मुलगी सविता आणि नातू सागर यांच्यासह राहतात. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. - त्यांचे शेजारी काथोड भावार्थे हे त्यांच्याविषयी गावात सतत जादूटोणा करतात असा प्रचार करत असल्यामुळे ग्रामस्थ कुटुंबाला टोमणे मारत होते, असे तक्रारीत नमूद केले आहे. - दरम्यान, आसनगाव येथील देवा म्हसकर या मांत्रिकावरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

संपूर्ण गाव विरोधात, मुलीने केली तक्रार - संपूर्ण गाव विरोधात असल्यामुळे ती तक्रार द्यायला धजावत नव्हती. परंतु शिंदे यांनी तिला आधार देऊन पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. - तसेच मुरबाड पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेबाबत तक्रार नोंद करून घ्यावी, अशी विनंती केली. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआगPoliceपोलिस