शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:20 IST

Ulhasnagar News: जागतिक जल दिनाचे औचित्य साधून प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी मुंडन केले. 

-मुरलीधर भवार, कल्याणउल्हास नदी ही बारमाही पाण्याचा मोठा जलस्त्रोत आहे. या नदीला येऊन मिळणारे सांडपाणी आणि रासायनिक पाण्याचे नाले बंद केले जात नाही. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. मात्र नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना केली जात नाही. आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधत मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. प्रशासनाच्या नाककर्तेपणाच्या विरोधात निकम यांच्यासह उमेश बोरगांवकर यांनी मुंडन करुन प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निकम यांच्यासह बोरगांवकर, माजी नगरसेवक कैलास शिंदे याच्या आंदोलनाला श्रीनिवास घाणेकर, शशिकांत दायमा आणि रविंद्र लिंगायत यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ते २०१४ सालापासून विविध सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. त्यांना केवळ आश्वासने दिली जातात. त्याची पूर्तता केली जात नाही. 

नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. उल्हास नदीला सांडपाण्याचे आणि रासायनिक पाण्याचे नाले येऊन मिळतात. उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण या सगळ्यांची इच्छा आहे. त्यांनी तसे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी. त्यासाठी तिचे प्रदूषण रोखले जावे अशी सरकारी यंत्रमांची इच्छाशक्ती नाही. गेल्या आठ वर्षापासून त्यांच्याकडून नदी प्रदूषण दूर करण्याची केवळ आश्वासने दिली जात आहे. सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईच्या विरोधात निकम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नदी पात्रात आंदोलन सुरु केले आहे. 

२२ मार्चपासून दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत आंदोलकर्ते नदी पात्रात उभे राहणार आहेत. सायंकाळी पाच ते सकाळी ११ या वेळेत ते नदी किनारी टाकलेल्या मंडपात बसून ढिम्म प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार आहेत. 

यापूर्वी निकम यांनी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी नदीपात्रात रात्रंदिवस उभे राहून जवळपास ३६ दिवस आंदोलन केले आहे. आत्ता तरी प्रशासनाने त्याची दखल घेऊन योग्य तरी कार्यवाही करावी अशी मागणी निकम यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन