काँग्रेसचे मतदार संपर्क अभियान अंतर्गत उल्हासनगर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
By सदानंद नाईक | Updated: June 21, 2023 17:44 IST2023-06-21T17:43:44+5:302023-06-21T17:44:22+5:30
उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्याच महिन्यात मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले.

काँग्रेसचे मतदार संपर्क अभियान अंतर्गत उल्हासनगर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
उल्हासनगर : शहरात काँग्रेस कमिटीच्या मतदार संपर्क अभियान अंतर्गत पदाधिकाऱयांची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. बैठकीला पक्षाच्या पदाधिकारी मनोज शिंदे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत मंडळ कमिटी व बूथ कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.
उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्याच महिन्यात मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. कार्यालयात पक्षाचे नेते मनोज शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन बूथ कमिटीची स्थापना करून त्या कार्यरत करण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. पक्षाच्या कार्यक्रमास व बैठकीस वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना यावेळी मनोज शिंदे यांनी शहराध्यक्ष यांना दिल्याने, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून केक कापण्यात आला.
शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानीक आहुजा, माजी गटनेत्या अंजली साळवे, प्रदेश प्रतिनिधि वज्जिरुदिन खान, प्रवक्ते आसेराम टाक, प्रा. नारायण गेमनानी, महादेव शेल्लर, विशाल सोनवणे, श्याम मढवी, फझल खान, संतोष मींडे, नियाज खान, राहूल बोदडे, सेवादल महिला जिल्हाध्यक्षा मनिषा महाकाले, सिंधुताई रामटेके, उषा गिरी, विद्या शर्मा, फामिदा सय्यद,लक्ष्मी वाघमारे ,अन्सार शेख आदी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.