शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खड्ड्यांवर आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा मुलामा; भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:45 IST

ठाणे शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला.

ठाणे : ठाणे शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच भारतात खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. यावेळी अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी विल्फे्रड जो, क्रि स जिगलर, डेव्हिड लाइटफूट तसेच पीजीके इंटरनॅशनल या कंपनीचे गुल कृपलानी आदी उपस्थित होते.अ‍ॅग्रीबाइंड नावाचे हे रसायन अमेरिकेत रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या मजबुतीसाठी, इरिगेशन चॅनल्स बनवण्यासाठी तसेच खड्डे भरण्यासाठी वापरले जाते. द्रव्यस्वरूपातील पॉलिसरसदृश हे रसायन खडीमध्ये मिसळून रस्ते तसेच खड्डे भरण्यासाठी वापरल्यास कमीतकमी पाच वर्षांपर्यंत रस्ते टिकू शकतात. सदरचे रसायन हे घातक, ज्वलनशील, स्फोटक नसून वापरण्यासाठी पर्यावरणाभिमुख आहे. त्यामुळे या रसायनाचा वापर करून सुरुवातीला स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक, नागरी संशोधन केंद्र रोड या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वापरून खड्डे भरण्यात येणार आहेत. त्यानंतर, त्याची पडताळणी करून भविष्यात इतर रस्ते बांधण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला नगरअभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल, चेतन पटेल आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका