शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

अंबरनाथच्या गिर्यारोहकांनी केला वानरलिंगी सुळका सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:54 PM

दोन तास ३७ मिनिटांचा कालावधी; प्रतिकूल परिस्थितीवर मात

बदलापूर : वानरलिंगी (खडापारसी) किल्ले जीवधनच्या डाव्या अंगाला लागून असलेल्या माळशेज घाटाच्या कुशीतले काही दुर्गम आणि बेलगाम सुळक्यांपैकी एक. येथे धडकायची हिम्मत फक्त वाऱ्याला आणि उतरायची मुभा फक्त पाण्याला. अतिशय अवघड असलेल्या केवळ प्रशिक्षित आणि मुरलेल्या गिर्यारोहकानेच हिम्मत करावी, असा हा सुळका प्रतिकूल परिस्थितीत सर करण्याची किमया केली आहे वाइल्ड विंग्स संस्थेच्या स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर यांनी. हे दोघेही तरुण अंबरनाथमध्ये राहणारे आहेत.अतिकठीण श्रेणीत गणला जाणारा हा वानरलिंगी सुळका ४०० फूट उंच असून याआधी एस.सी.आय. या गिर्यारोहक संस्थेद्वारे त्यावर गिर्यारोहण करण्यासाठी ६२ ठिकाणी बोल्ट लावण्यात आले आहेत. लिंगाणा, तैल-बैला, डुक्स नोज, भैरवगड, सरसगड-वॉल यासारख्या सुळक्यांवर चढाई केल्यानंतर आतुरता होती ती नवीन एका मोहिमेची. गणेश गिध आणि रोहित वर्तक यांनी केलेल्या सेव्हन समीट यातील वानरलिंगी (खडापारसी) सुळका सर करायचा, असे ठरवले. स्वप्नीलच्या या संकल्पनेला बळ दिले ते त्याच्यासोबत या मोहिमेत असणाºया रोशन भोईर आणि वाइल्ड विंग्सच्या सदस्यांनी.प्रश्न होता तो कधी, आॅक्टोबरमध्ये करायचा ठरले पण पाऊस मात्र थांबायचे नाव घेत नसल्याने मोहीम नोव्हेंबरमध्ये केली. सकाळी ७ वाजता चढाईला सुरुवात करायचे ठरले, पण धुके आणि थंडीमुळे ७ वाजताची चढाई १० वर गेली. गिर्यारोहणाचे साहित्य आणि गडदेवतांची पूजा करून चढाईला सुरुवात केली गेली. वानरलिंगी सुळका चढायला २ तास ३७ मिनिटे लागली. पावसाळ्यानंतर अशा प्रकारचे सुळके चढण्यासाठी घातक आणि कठीण असते. याआधी हा सुळका सर झाला आहे. पण असे सुळके पावसानंतर वारा, पाणी खाऊन आपले रूप बदलतात. अशावेळी सुळके सर करताना माती, दगड कोसळून जीवावर बेतू शकते. मात्र स्वप्नील, रोशनने हे आव्हान अगदी सहज स्वीकारले. या मोहिमेत समीर चिकने, अनंत यादव, मधुर धनावडे, श्रीधर वालम, तानाजी लाड, हरीश जाधव, अक्षय यादव, ओंकार यादव, राजू म्हसे यांचा समावेश होता.आयुष्यात काहीतरी वेगळे हवे म्हणून गिर्यारोहणाला सुरुवात केली. पुढे काही अशा व्यक्ती मिळत गेल्या, ज्यामुळे आयुष्यच बदलून गेले. काम आणि भटकंतीचा समन्वय साधत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळू लागलो. काही अशा व्यक्ती मिळाल्या, त्यांचे मार्गदर्शन मिळाले.- स्वप्नील साळुंके, गिर्यारोहक