शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

साउंड सिस्टिमला पर्याय पारंपरिक वाद्यांचा , म्यूट डे च्या घोषणेमुळे आयोजकांचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:53 IST

डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी पाला संघटनेने १५ आॅगस्टला साउंड म्यूट डे जाहीर केल्यामुळे स्वातंत्र्य दिन तसेच यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

- स्नेहा पावसकर  ठाणे : डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी पाला संघटनेने १५ आॅगस्टला साउंड म्यूट डे जाहीर केल्यामुळे स्वातंत्र्य दिन तसेच यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, ढोलताशे अशी पारंपरिक वाद्ये वाजवणे तसेच एखाद्या सहकारी किंवा सदस्याच्या घरातील साउंड सिस्टिमचा वापर करणे, अशा पर्यायांचा अवलंब करण्याची दहीहंडी आयोजकांची तयारी दिसते आहे.या वर्षी न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध उठवल्याने गोविंदांसह सर्वसामान्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच, १५ आॅगस्टलाच यंदा दहीहंडी असल्याने दोन सणांचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, ऐन या उत्सवाच्याच दिवशी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशनने म्यूट डे जाहीर केल्याने उत्सवाचे वातावरणच जणू म्यूट झाले. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी झेंडावंदनानंतर देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम होतात.या सगळ्यात साउंड सिस्टिमचा वापर केला जातो. तर, दहीहंडी उत्सव हा साउंड सिस्टिमशिवाय जणू कठीणच वाटतो. थरथराटानंतर डीजेच्या तालावर गोविंदा थिरकतात, तर सेलिबे्रटींसह मनोरंजनाच्या कार्यक्रमातही साउंड सिस्टिम अविभाज्य घटक असतो. मात्र, त्याच दिवशी म्यूट डे जाहीर केल्यामुळे यंदा या सिस्टिमचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आयोजकांनी पारंपरिक वाद्ये हा साउंड सिस्टिमला पर्याय ठेवला आहे. तर, बहुतांशी दहीहंडी उत्सवाचे आयोजक विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी असल्याने जिथे खरेच आवश्यकता असेल, तिथे ग्रुपमधील कोणाचीही साउंड सिस्टिम उपलब्ध करू, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.आम्ही दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहोत. डीजेचा वापर करणार नाही. हे आधीच जाहीर केले आहे. मात्र, मोठ्या समूहाला संबोधित करण्यासाठी साउंड सिस्टिमची गरज भासते. त्यामुळे त्यादृष्टीने आमच्यातील एखाद्या सहकाºयाच्या घरातील साउंड सिस्टिमचा आम्ही वापर करू. मात्र, त्यातही डेसिबलबाबत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेऊ.- अविनाश जाधव, आयोजक, मनसे ठाणे शहर दहीहंडी उत्सवदहीहंडी उत्सवात डीजेचा वापर केला जात असला, तरी यंदा म्यूट डे जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात आम्ही पारंपरिक वाद्यांचा वापर करू. तसेच साउंड सिस्टिम जिथे आवश्यक असेल, तिथे आमच्या खाजगी साउंड सिस्टिमचा वापर करण्याच्या विचारात आहोत.- संजय भोईर, आयोजक, साई जलाराम प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवयंदा दहीहंडीच्या दिवशी म्यूट डे घोषित केलेला असला, तरी संस्कृ तीचा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होणारच आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करून संस्कृती प्रतिष्ठान आपली संस्कृती जपेल.- पूर्वेश सरनाईक, आयोजकसंस्कृ ती प्रतिष्ठानयापूर्वी मोठ्या साउंड सिस्टिम नव्हत्या. तेव्हाही दहीहंडी उत्सव साजरा होतच होता. हल्ली मोठ्या दणदणाटावर गोविंदा नाचतात. पण जे जुने गोविंदा आहेत, त्यांना पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरायला आवडतो. त्यामुळे यंदा म्यूट डे जरी जाहीर केला असला तरी गोविंदांचा उत्साह कायम असेल.- समीर पेंढारे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा दहीहंडी समन्वय समिती