आधीच खायची मारामार, मग कर कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:59+5:302021-09-23T04:45:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक जण आयुष्यभर धडपड करीत असतो. अशातच हातावर पोट असणाऱ्या घटकांचे ...

Already fighting to eat, then how to pay taxes? | आधीच खायची मारामार, मग कर कसा भरणार?

आधीच खायची मारामार, मग कर कसा भरणार?

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक जण आयुष्यभर धडपड करीत असतो. अशातच हातावर पोट असणाऱ्या घटकांचे उत्पन्नच मुळात अत्यल्प असल्याने ते सरकारला कोणताच कर भरतच नसले तरी विविध माध्यमातून अप्रत्यक्षरित्या आपण तो देत असतो, याची जाणीव अनेकांना नसल्याचे समोर आले आहे.

उच्च पगारदार आणि काही मोजके व्यावसायिकच सरकारला प्राप्तिकरासह इतर विविध कर देतात, परंतु असंघटित वर्ग आणि छोटे व्यावसायिक कोणतेच कर भरत नाहीत. दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. लहान, मोठे व्यावसायिक, सामान्य नोकरदार तसेच रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच हिरावले गेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विविध निर्बंधांमध्ये सूट मिळाली असली तरी अजूनही सलून, गटई कामगार, छोटे विक्रेते, चहाची टपरी, वडापाव विक्रेत्यांसह छोटे हॉटेलचालक या सारखे लहान-मोठे व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत. या परिस्थितीत वेगवेगळ्या व्यावसायिकांशी चर्चा केली असता आपल्याला मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याने कर भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्पन्न मर्यादित असले तर प्रत्यक्ष प्राप्तिकर भरला जात नाही, परंतु प्रत्येकजण दैनंदिन जीवनातील वस्तू असो अथवा व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करताना विविध स्वरूपात अप्रत्यक्षपणे कर भरत असतो. त्यामुळे कर हा प्रत्येकाला भरावा लागतो. परंतु, याची अनेकांना जाणीवच नसल्याचे समोर आले आहे.

आपण कर भरता का ?

नाकाकामगार : कोविडमुळे रोजंदारीवर दररोज काम मिळण्याची शाश्वती नाही, मग आम्ही कर कसे काय भरणार.

रिक्षाचालक : कोविडमुळे अनेकांनी रिक्षाने प्रवास करणे सोडून दिले आहे. यामुळे आधीच मर्यादित असलेले उत्पन्न आणखीनच घटले आहे. त्यामुळे प्राप्तिकर कधीच भरण्याचा प्रश्न आला नाही.

फळे/भाजीपाला विक्रेता : महापालिकेचा दैनंदिन कर नियमित भरतो. त्याव्यतिरिक्त कोणताही कर भरत नाही.

सलूनचालक : व्यवसायातून घरखर्च, घर आणि दुकान भाडेदेखील, वीजबिल देखील निघत नाही, टॅक्स कसा भरणार ?

............

प्रत्येकजण टॅक्स भरतो

उत्पन्नावर जो प्रत्यक्ष कर भरला जातो, त्याला प्राप्तिकर म्हणतात. परंतु, प्रत्येक सामान्य नागरिक खरेदी करताना किंवा विविध सेवा घेण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स भरत असतो. तो अप्रत्यक्ष असल्याने याबाबत अनेकांना माहिती नसल्याने आपण कोणताही टॅक्स भरत नाही असेच त्यांना वाटते.

- कर सल्लागार

-----------

Web Title: Already fighting to eat, then how to pay taxes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.