शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 1:37 AM

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे.

- अजित मांडकेठाणे : २००९ पासून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा दबदबा आहे. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अधिकची मते मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात बोलणारे आव्हाड हे एकमेव शत्रू असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न युतीकडून सुरूझाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळीसुद्धा या मतदारसंघात चाचपणी करताना दिसत आहेत. परंतु, या मतदारसंघातून कोण लढणार शिवसेना की भाजप, याबाबतची उत्सुकता शिगेला आहे. शिवाय, वंचित आघाडी आणि एमआयएम हासुद्धा या मतदारसंघात निर्णायक घटक मानला जात आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देऊन कळवा, विटावा पट्ट्यातील मतेसुद्धा आपल्या पारड्यात खेचण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्यानुसार, मागील काही महिन्यांत या मतदारसंघाचा अभ्यास सुरू आहे.कळवा-मुंब्रा यासह राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसला. कळव्यात शिवसेनेकडे केवळ सात नगरसेवक असून, तर मुंब्य्रात भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेला ३८ हजार ८५०, एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली, तरी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार निर्णायक भूमिकेत असणार आहे. एकूणच आता युतीकडून आव्हाड गड सर करण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना लढणार की भाजप, यावर सध्या या दोन्ही पक्षांचा अभ्यास सुरू आहे. शिवाय, एमआयएमलासुद्धा हाताशी घेण्याचा प्रयत्न या दोघांनी सुरू केला आहे.मात्र, असे जरी असले तरी २००९ मध्ये कळवा-मुंब्य्राची असलेली परिस्थिती आणि आता २०१९ मध्ये बदललेली परिस्थिती ही आव्हाड यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला आमदार म्हणूनही त्यांची या पट्ट्यात ओळख आहे. मागील १० वर्षांत दिलेली आश्वासने आणि त्या दृष्टीने केलेली वचनपूर्ती ही आव्हाडांसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, भाजप सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने बोलणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच देशातील भाजपविरोधी असणाऱ्या मंडळींना जसे शांत केले, तसाच काहीसा प्रयत्न आता होताना दिसू लागला आहे.

टॅग्स :thaneठाणे