सर्वधर्मीयांना मशिदींमध्ये प्रवेश, जमाते-ए-इस्लामी हिंदची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:01 IST2018-02-24T00:01:23+5:302018-02-24T00:01:23+5:30
मशीद तसेच मदरशांमध्ये नेमके काय सुरू असते. याबद्दलची जिज्ञासा असलेल्यांना त्यांची इत्थंभूत माहिती मिळविण्यासाठी आता थेट मशिदींमध्ये प्रवेश मिळणार आहे

सर्वधर्मीयांना मशिदींमध्ये प्रवेश, जमाते-ए-इस्लामी हिंदची मोहीम
मुंब्रा : मशीद तसेच मदरशांमध्ये नेमके काय सुरू असते. याबद्दलची जिज्ञासा असलेल्यांना त्यांची इत्थंभूत माहिती मिळविण्यासाठी आता थेट मशिदींमध्ये प्रवेश मिळणार आहे. मशीद आणि मदरशांबद्दल मुस्लिमेतर धर्मियांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत, धार्मिक सलोखा वाढावा या हेतूने मशीद परिचय आणि चहापानी या अनोख्या मोहिमेची सुरुवात जमात ए इस्लामी हिंदने महाराष्ट्रात सुरू केली आहे.
पहाटेच्या (फजर) च्या नमाजापासून मशिदींमध्ये सुरू होणारे धार्मिक परिचालन तसेच मदरशांमध्ये देण्यात येणाºया अरबी भाषेतील कुराण पठणाच्या शिक्षणा बद्दल इतर धर्मियांमध्ये कमालीचे गैरसमज आहेत. तसेच मशिदींमध्ये पाच वेळा तर शुक्रवारी दुपारी अदा करण्यात येणारी सामूहिक नमाज आणि मदरशांमध्ये देण्यात येत असलेल्या शिक्षणाबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. परंतु, धार्मिक बंधनामुळे त्यांना मशिदींमध्ये थेट प्रवेश मिळेल की नाही याबद्दल त्यांच्यात साशंकता असते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी हिंदने पुढाकार घेतला आहे.
याअंर्तगत वैयक्तिक व्यक्ती, समूह, पत्रकार, सामाजिक संस्था आदींना मशिदींना भेट देण्याचे आवाहन केले आहे. या भेटीत मशिदींमध्ये दिवसभर होणाºया पाच नमाजांचे महत्त्व आणि त्या अदा करण्यामागची कारणे आदी गोष्टी समजावून सांगितल्या जातील.