सेना नगरसेवकाला मारण्याची उल्हासनगरात सुपारी

By Admin | Updated: January 11, 2017 07:05 IST2017-01-11T07:05:12+5:302017-01-11T07:05:12+5:30

शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक विजय पाटील यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी केला असून

Alhasagaragarh to kill the army corporator | सेना नगरसेवकाला मारण्याची उल्हासनगरात सुपारी

सेना नगरसेवकाला मारण्याची उल्हासनगरात सुपारी

उल्हासनगर : शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक विजय पाटील यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी केला असून त्याबाबत चौकशीचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व अंबरनाथ पोलीस ठाण्याला दिले आहे.
उल्हासनगरच्या प्रभाग ३९ मधून शिवसेनेच्या तिकिटावर प्रधान पाटील निवडून आले. त्याच प्रभागातून त्यांच्या भावाची सून अपेक्षा पाटील निवडून आल्या असून त्या महापौर आहेत. १० डिसेंबरला संध्याकाळी प्रधान पाटील यांना मनोज ठाकूर, प्रकाश भंडारी व शकील खान यांच्या नावाने ठार मारण्याीच धमकी देणारा फोन आला. ज्यांच्या नावे धमकी आली त्यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्याने प्रधान यांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी आमच्या नावाचा वापर केल्याचा खुलासा केला. त्यामुळे हिललाईन पोलीस ठाण्यात प्रधान यांनी तक्रार केली. त्यानंतर २३ डिसेंबरला त्यांना शंकर चौहान नावाची व्यक्ती भेटली. तुमचा नातलग व नगरसेवक विजय पाटील यांनी तुम्हाला ठार मारण्याची सुपारी सलमान भाई याला दिल्याची माहिती त्याने प्रधान यांना दिली. हे शूटर मुंब्रा व भिवंडी येथे राहणारे असल्याचा तपशीलही पुरवला. या व्यक्ती नेताजी प्रभाग गार्डनमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी प्रधान बॅडमिंटन खेळण्यासाठी कधी येतात त्याची चौकशी केल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाला धोका असल्याचे सांगत या प्रकाराची चौकशी करण्याचे पत्र त्यांनी पोलिसांना दिले. संरक्षण पुरवण्याची मागणीही त्यांनी अंबरनाथ पोलिसांकडे केली. (प्रतिनिधी)

Web Title: Alhasagaragarh to kill the army corporator