शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

फडणवीस चषकाच्या सोहळ्यात अजित पवारांचा फोटो झळकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 2:23 AM

कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यानचा प्रसंग

कल्याण : कल्याणमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बॅनरवर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे छायाचित्र झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कबड्डी सामन्यांचे आयोजक भाजपचे आ. गणपत गायकवाड हे आहेत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते फडणवीस हजर होते. ते बोलत असताना त्यांच्या मागे अजित पवार यांचे असलेले छायाचित्र नजरेत भरत होते.कबड्डी सामन्यांकरिता दिला जाणारा चषक हा फडणवीस यांच्या नावे असल्याने ते उद्घाटनाच्या सोहळ्याला आवर्जून हजर राहिले. फडणवीस बोलत असताना मागेच अजित पवार यांचा फोटो असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी कुजबुज सुरू झाली. राज्यात सत्तास्थापनेचे नाट्य सुरू असताना फडणवीस व पवार यांचा झालेला शपथविधी राज्यातच नव्हे तर देशभर गाजला होता. ‘हवापाण्या’च्या गप्पा राज्यातील सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करून गेल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात अपेक्षित असून अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद व गृहखाते मिळणार का, यावरील पडदा अजून उठलेला नाही. पवार यांना सिंचन घोटाळ्यात अलीकडेच दिली गेलेली क्लीन चिट मागील फडणवीस सरकारनेच दिली होती, असा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे छायाचित्र फडणवीस चषकाच्या सोहळ्यात झळकणे हा निव्वळ योगायोग नाही. राज्यातील सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी भाजप अजित पवार यांच्या त्या शपथविधी सोहळ्यातून भाजपशी त्यांच्या निर्माण झालेल्या जवळिकीचा खुबीने वापर करीत असल्याचे बोलले जात आहे.बॅनरवरील अजित पवार यांच्या छायाचित्राचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. पवार हे कबड्डी महासंघाचे अध्यक्ष असल्याने त्यांचे छायाचित्र लावले आहे.-आ. गणपत गायकवाड, आयोजक, फडणवीस चषक कबड्डी स्पर्धा, कल्याण

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार