‘आग्रा बाजार’ आणि ‘आगऱ्याहून सुटका’ सादर!
By Admin | Updated: November 11, 2016 03:03 IST2016-11-11T03:03:56+5:302016-11-11T03:03:56+5:30
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५६व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी ठाणे केंद्रावर ‘आगऱ्याहून सुटका’

‘आग्रा बाजार’ आणि ‘आगऱ्याहून सुटका’ सादर!
ठाणे/कल्याण : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५६व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी ठाणे केंद्रावर ‘आगऱ्याहून सुटका’ या नाटकाद्वारे तर कल्याणमध्ये ‘आग्रा बाजार’द्वारे स्पर्धेतले तिसरे पुष्प गुंफले गेले.
कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात सुरू असलेल्या स्पर्धेत ९ नोव्हेंबरला बदलापूरच्या एम्पिरीयल फाउंडेशनच्या वतीने हबीब तनवीर लिखित (अनुवाद अमेय सावंत) आणि सुदर्शन पाटील दिग्दर्शित ‘आग्रा बाजार’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात भरत कोळी, जयदीप माळी, विशाल व्यापारी, आदित्य जावळेकर, राहुल वाघमारे, अमेय सावंत, वल्लभ रावण, भूषण कोलते, सागर मोरे, अविनाश खरात, गायत्री पाटील, सुशांत हरियाण, श्रीपाद चौधरी, ओमकार पाटील, पंकज राठोड, राहुल चव्हाण, पीयूष, श्रीया शांडिल्य, सितांशु सालुंखे, उत्कर्षा घोरबे, नेहा वाघचौरे, चैतन्य जावळे, सुदर्शन पाटील यानी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना करिष्मा मुठ्ठल-मधुरा मोतीराळे, नेपथ्य भूषण कोलते, वेशभूषा अमेय सावंत-मधुरा मोतीराळे तर रंगभूषा वल्लभ रावण याची होती.
ठाणे केंद्रावर ९ नोव्हेंबरला सफाळेच्या अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने योगेश दळवी दिग्दर्शित ‘आगऱ्याहून सुटका’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये सादर झालेल्या या नाटकात शीलरत्न जमदाडे, एकनाथ पडकढ, मनीष कानिटकर, योगेश दळवी, सचिन भोसले, मधुरा भागवत, रेवती दळवी, जितेश मोरे, अभय धुमाळ, शंतनु नातू यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. प्रकाशयोजना रघु ढेमरे, नेपथ्य संजय कांबळे-शीलरत्न जमदाडे, संगीत अभिषेक-दत्ता, वेशभूषा गणेश लोणारे, रंगभूषा कमलेश बिचे यांनी केली.