शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:52 IST

ठाणेकरांसाठी सुखकर प्रवासी हमी न देता जुन्याच योजनांचा मुलामा देऊन ठाणे परिवहन सेवेने फेब्रुवारी महिन्यात मूळ अंदाजपत्रक सादर केले होते.

ठाणे : ठाणेकरांसाठी सुखकर प्रवासी हमी न देता जुन्याच योजनांचा मुलामा देऊन ठाणे परिवहन सेवेने फेब्रुवारी महिन्यात मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. यावेळी प्रस्तावित केलेली २० टक्के तिकीट दरवाढ परिवहन समितीने फेटाळली होती. परंतु, यानंतर ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढीचे संकट ओढावले आहे. परिवहन समितीने ही दरवाढ फेटाळली असली तरी येत्या महासभेत तिकीट दरवाढीचा हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे, तशा हालचाली आता सुरू झाल्या आहेत.ठाणे परिवहन सेवेमार्फत फेब्रुवारी महिन्यात परिवहन समितीसमोर २०१८-१९ चे २५१.०३ कोटी आणि सन २०१९-२० चे ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात ठाणेकरांवर सहाव्यांदा तिकीट दरवाढ लादण्यासंदर्भात सूचित केले होते. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असल्या तरीदेखील रस्त्यावर टीएमटीच्या स्वत:च्या ८० च्या आसपास तर जीसीसीच्या माध्यमातून १९० आणि एसी २५ अशा एकूण २९५ च्या बस धावत आहेत. त्यातून अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असून परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या घरात आहे.ठाणेकरांना आजही सुखकर प्रवासी हमी परिवहन प्रशासनाने दिलेली नाही. असे असताना सहाव्यांदा परिवहनने ही २० टक्के तिकीट दरवाढ सुचविली आहे. चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरात झालेली लक्षणीय वाढ, परिवहन सेवेच्या संचलनात असलेल्या जुन्या बस यामुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच शासनाने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे वाहनांचे सुटे भाग खरेदी किमतीत झालेली दरवाढ यासह धक्कादायक म्हणजे सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे कारणही परिवहन प्रशासनाने भाडेवाढीसाठी पुढे केले आहे.या सर्व बाबींमुळे परिवहन सेवेच्या दैनंदिन महसुली तुटीमध्ये वाढ होत आहे. ती भरून काढण्यासाठी इतर उत्पन्नाच्या स्रोतांबरोबर भाडेवाढ ही प्रस्तावित केली असल्याचे परिवहनने स्पष्ट केले होते. परिवहनच्या तिकीटदरात २० टक्के भाडेवाढ याप्रमाणे दैनंदिन ३.४० लाख यानुसार संभाव्य भाडेवाढ अपेक्षित रक्कम ९ कोटी ३५ लाख अपेक्षित धरली आहे. त्यानुसार प्रवासी उत्पन्नापोटी १६३.७४ कोटींची जमा अपेक्षित धरण्यात आली होती.परिवहन समितीने हा दरवाढीचा प्रस्ताव निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फेटाळला होता. त्यानंतर परिवहन प्रशासनाने मात्र परिवहन समितीला केराची टोपली दाखवून तो नव्याने महासभेत मंजुरीसाठी ठेवण्याचे प्रयोजन केले आहे. परंतु, समितीने फेटाळलेला प्रस्ताव महासभा मंजूर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सहाव्यांदा होणार भाडेवाढयापूर्वी १ जानेवारी २००३, ११ आॅगस्ट २००७, १६ जून २०११ आणि मार्च २०१३ मध्ये भाडेवाढ झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पाचव्यांदा भाडेवाढ केली होती. त्यानंतर आता २०१९ मध्ये सहाव्यांदा भाडेवाढ प्रस्तावित केली आहे.एकीकडे मुंबईत शिवसेनेच्या माध्यमातून बेस्टचे तिकीट हे पाच रुपये करण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यातही तशा प्रकारच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, असे असताना प्रशासनाकडून हा दरवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याने त्याला सत्ताधारी शिवसेना कशा पद्धतीने सामोरे जाते, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका