शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची मीरा-भाईंदर महापालिकेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:49 IST

मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग

मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग कार्यालयासमोरील क्षयरोग केंद्राची सुमारे साडेचार हजार चौ.फुट जागा नया नगर पोलीस ठाण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी महासभेस सादर केलाय. विशेष म्हणजे सद्याचे पोलीस ठाणे रस्ता रुंदीकरणाने बाधित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याचे प्रस्तावात म्हटल्याने पोलीस दलात चलबिचल सुरू झाली आहे.मीरा रोड पोलीस ठाण्याची मोठी हद्द व लोकसंख्या पाहता मार्च 2014मध्ये मीरा रोड पूर्व भागासाठी नया नगर पोलीस ठाणे मंजूर झाले. परंतु पोलीस ठाण्यासाठी महापालिका जागा देत नसल्याने अखेर जुलै 2015मध्ये नया नगर पोलीस चौकीच्या जागेतच नवे नया नगर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. अत्यंत तुटपुंजी जागा असल्याने जणू काही खुराड्यातूनच पोलीस ठाण्याचा कारभार चालला आहे.पोलीस ठाण्याला लॉकअप नाही, महिला व पुरुष पोलीसांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही, महिला पोलीसांना कपडे बदलण्याची सोय नाही, विश्रांती कक्ष नाही. दाटीवाटीने बवनलेल्या छोट्या केबिन, पत्र्याच्या शेड खाली ठाणे अमलदारचा कारभार, वाहनं ठेवायला नसलेली जागा त्यातच अनेक विभाग हे अन्य चौक्यांमध्ये हलवण्यात आले आहेत.अशा खुराड्यात पोलीस ठाण्याचा कारभार चालला असताना पालिके कडे सातत्याने पोलीस ठाण्यासाठी जागा मागून देखील टोलवाटोलवी चालली होती. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा चालवला होता. अखेर महापालिकेने आता त्यांच्या रसाझ प्रभाग कार्यालया समोर रसाझ एनक्लेव्ह इमारतीत असलेली शहर क्षयरोग निवारण केंद्राची तळ अधिक पहिल्या मजल्याची जागा पोलीस ठाण्यासाठी देण्यास तयारी दाखवली आहे.सदर क्षयरोग निवारण केंद्र हे निवासी भागात असल्याने रहिवाशांचा आधी पासुनच यास विरोध आहे. त्यामुळे सदर केंद्र हे रामदेव पार्क येथील आरक्षण क्र. २३२ च्या जागेत हलवण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी तसा प्रस्ताव दिलाय. सद्याचे नया नगर पोलीस ठाणे हे रस्ता रुंदीकरणाने बाधीत होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरुपात करण्याचे आयुक्तांनी म्हटल्याने पोलिसांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोड