शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 Live: मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय?
4
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
5
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
6
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
7
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
8
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
9
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
10
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
11
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
12
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
13
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
14
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
15
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
16
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
17
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
18
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
19
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीनंतरही वसुली असमाधानकारक, ठामपाने राबविल्या अनेक योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:45 IST

ठाणे शहर विकास विभागाच्या उत्पन्नावरून वादळ पेटले असतानाच मालमत्ताकराच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे.

ठाणे : शहर विकास विभागाच्या उत्पन्नावरून वादळ पेटले असतानाच मालमत्ताकराच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ३४.३५ कोटींची वाढ झाली असली, तरी ती समाधानकारक नाही. मालमत्ताकर विभागाने २७ नोव्हेंबरपर्यंत ३५४.१७ कोटींची वसुली केली आहे.मागील वर्षी या विभागाला ५५० कोटींचे लक्ष्य दिले होते. यंदा त्यात वाढ करून ते ६५० कोटी ठेवले आहे. निवडणुकीच्या काळात या विभागाकडून ४२ कोटींच्या आसपास वसुली झाली खरी, मात्र एकूणच उत्पन्न पाहता मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तरी ती अधिकची नाही. त्यामुळे शहर विकास विभागाप्रमाणेच या विभागाच्याही परिस्थितीत होते की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. मालमत्ताकर वसुली वाढावी म्हणून या विभागाने विविध योजना राबविल्या. त्यानुसार, लोकांच्या घरात ही बिले पोहोचवण्यात आली होती. त्यामुळेच पालिकेच्या मालमत्ताकरात यंदा वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक १०५.८४ कोटींची वसुली झाली आहे. तर, सर्वात कमी वसुली १९.५४ कोटी ही मुंब्रा प्रभाग समितीमधून झाली आहे.कस्टमाइज्ड सॉफ्टवेअरमुळे झाला फायदामहापालिकेने या आर्थिक वर्षात करनिर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. यामध्ये कस्टमाइज्ड सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. करदात्यांना आपले करनिर्धारण तपशील पाहणे, डाउनलोड व कर प्रदान करण्यासाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध केली असून करदात्यांना एसएमएसद्वारे कर रक्कम जमा झाल्याची खात्री कर डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड, पीओएस मशीनद्वारे विनाशुल्क करसंकलन सुविधा महापालिकेच्या २० करसंकलन केंद्राबरोबरच मोबाइल व्हॅनद्वारेदेखील कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तरीसुद्धा, अद्यापही वसुलीत हवी तशी भर पडलेली नाही. त्यामुळे पुढील चार महिन्यांत वसुली वाढविण्यासाठी पालिकेकडून कसे प्रयत्न होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे