हरविलेला चिमुरडा सहा महिन्यांनी स्वगृही
By Admin | Updated: June 22, 2017 05:19 IST2017-06-22T05:19:30+5:302017-06-22T05:19:30+5:30
घरची गरिबी आणि त्यातच वडिलांना आलेला अर्धांगवायूचा झटका यामुळे उदरनिर्वाहासाठी आईबरोबर कर्नाटक येथून नवी मुंबईत आलेल्या एका ९ वर्षीय मुलाची आणि त्याच्या आईची

हरविलेला चिमुरडा सहा महिन्यांनी स्वगृही
पंकज रोडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घरची गरिबी आणि त्यातच वडिलांना आलेला अर्धांगवायूचा झटका यामुळे उदरनिर्वाहासाठी आईबरोबर कर्नाटक येथून नवी मुंबईत आलेल्या एका ९ वर्षीय मुलाची आणि त्याच्या आईची अचानक तिसऱ्याच दिवशी ताटातुट झाली. त्या चिमुरड्याला सहा महिन्यांनी अखेर स्वगृही पाठविण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या चॉईल्ड प्रोटोक्शन युनीटला यश आले आहे. याचदरम्यान, त्या मुलाने सांगितलेल्या चार अक्षरी गावाच्या नावावरून ठाणे पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ताच नाहीतर नातेवाईक शोधून काढले. हा पत्ता शोधण्यासाठी कर्नाटक, बोराबंडा येथील कलेक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिले.
अजय हा मोठा भाऊ-बहिण आणि आई-वडिलांसह कर्नाकट येथील बोराबंडा या गावी राहत होता. घरची गरिबी आणि त्यातच त्याच्या वडिलांना अर्धांगवायुचा झटका आल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. त्यामुळे ती अजयला घेऊन सहा महिन्यांपूर्वीच उदरनिर्वाहासाठी नवी मुंबईत आली. मात्र, तिसऱ्या दिवशी त्या मायलेकांची ताटातुट झाली.