विलगीकरणानंतर ३२८ पोलीस पुन्हा झाले सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:22 AM2020-06-22T00:22:05+5:302020-06-22T00:22:11+5:30

दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर आतापर्यंत १६ अधिकारी व १३८ कर्मचारी, असे १५४ पोलीस हे पुन्हा ड्युटीवर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

After the separation, 328 police were ready again | विलगीकरणानंतर ३२८ पोलीस पुन्हा झाले सज्ज

विलगीकरणानंतर ३२८ पोलीस पुन्हा झाले सज्ज

Next

जितेंद्र कालेकर 
ठाणे : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अल्प धोकादायक स्थितीतील (लो रिस्क) ३२८, तर अतिधोकादायक स्थितीतील पाच असे ३३३ कोविड युद्धे पोलीस पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यात पोलीस मुख्यालयातील सर्वाधिक म्हणजे १३७ पोलीस आहेत. दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर आतापर्यंत १६ अधिकारी व १३८ कर्मचारी, असे १५४ पोलीस हे पुन्हा ड्युटीवर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनामुळे आतापर्यंत ३३ अधिकारी आणि ३०९ कर्मचारी, असे ३४२ पोलीस बाधित झाले आहेत. बाधित पोलीस, नागरिक किंवा आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन व्हावे लागले. सुरुवातीला मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे बाधित झाल्यानंतर तेथील काही अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाºयांनाही क्वारंटाइन व्हावे लागले. हीच परिस्थिती वर्तकनगर पोलीस ठाण्यावर एका हाणामारीतील आरोपीमुळे ओढवली. वर्तकनगरच्या वरिष्ठ निरीक्षकासह दोन अधिकारी तर पोलीस ठाण्यातच क्वारंटाइन होऊन ५५ दिवस कुटुंबांपासून दूर राहिले.
प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आपला १४ दिवसांचा विलगीकरणाचा कार्यकाळ संपवून पुन्हा ड्युटीवर रुजू होत आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात १७ अधिकारी आणि ५२ कर्मचारी, असे ६९ पोलीस पुन्हा रुजू झाले. पोलीस मुख्यालयातील एका अधिकाºयासह १३६ कर्मचारी असे १३७, तर उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्याचे चार अधिकारी आणि ११ कर्मचारी असे १५, अंबरनाथच्या एका अधिकाºयासह १२, वर्तकनगरच्या तीन अधिकाºयांसह ३० तसेच वाहतूक शाखेचे एक अधिकारी आणि २० कर्मचारी, असे २१ जण तर, त्याचबरोबर विशेष शाखेचे सहा पोलीस असे संपूर्ण आयुक्तालयातून ४६ अधिकाºयांसह ३२६ पोलीस कर्तव्यावर पुन्हा रुजू झाले आहेत.कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानंतर १४ दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर कोणताही त्रास नसल्याचे आढळल्यानंतर हे पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन आतापर्यंत २६ अधिकारी आणि २३४ कर्मचारी अशा २६० पोलिसांनी यशस्वीपणे त्यावर मात केली. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर १४ दिवस विश्रांती घेऊन त्यातील १६ अधिकारी आणि १३८ कर्मचारी, असे १५४ पोलीस हे पुन्हा कर्तव्यासाठी आणि कोरोनाच्या लढाईला सामोरे जाण्यासाठी हजर झाले आहेत.
>रुग्णालयात दाखल झालेले पोलीस किंवा नागरिक यांच्या प्रकृतीबाबत ते बरे होईपर्यंत डॉक्टर तसेच प्रशासनामार्फत त्यांची चौकशी केली. शक्य झाल्यास रुग्णाशीही थेट फोनद्वारे बातचीत केली. त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील मनोबल वाढविले.
- विवेक फणसळकर,
पोलीस आयुक्त, ठाणे शहर

Web Title: After the separation, 328 police were ready again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.