शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 3:35 AM

भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले.

- धीरज परब  मीरा रोड : भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिनकॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. शहा यांचे कुटुंबत्या आघातातून आजही सावरलेले नाही. छत्तीस वर्षांचे कार्तिक शहा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी उपचाराविना तडफडत प्राण सोडले. सध्या त्यांचा मेव्हणा शहाचालवत असलेली शालेय विद्यार्थ्यांना सोडणारी स्कूल व्हॅन चालवून त्यांच्या पत्नी व दोन मुलांचा सांभाळ करीत आहे.भार्इंदर पश्चिमेतील देवचंद नगरातील श्रीपालनगर येथील दीपक शहा यांचे घर गाठले. दीपक यांच्या पत्नी अश्विना तर धाकटी मुलगी दिशा या राजस्थानला नातलगांकडे गेल्याचे समजले. दिवाळीत शहा कुटुंब गेली दोन वर्षे घरी राहत नाही. त्यामुळे आजूबाजूची घरे दिव्यांची रोषणाई व कंदील यांनी उजळली असताना शहा यांचे घर काळोखात बुडून गेले होते. त्यांच्या काही शेजाऱ्यापाजाºयांकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शहा हे मनमिळावू स्वभावाचे व शांत गृहस्थ होते. नोटाबंदी झाल्यानंतर ते त्रस्त होते. बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी किंवा पैसे काढण्याकरिता ते १६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता गेले. दोन ते अडीच तासांनंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. दीपक हेच शहा कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. नुकतेच त्या वेळी त्यांच्या मोठ्या मुलीचे जैनाचे लग्न झाले होते.गेली २५ वर्षे हे कुटुंब तेथेच वास्तव्य करीत आहे. शहा कुटुंबाचा चरितार्थ वडिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच त्यांच्या मृत्यूपश्चात मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युईटीच्या पैशावर चालत असावा, असा अंदाज शेजाºयांनी व्यक्त केला. शहा यांचा मृत्यू नोटाबंदीमुळे झाला, अशी नोंद करून घ्यायलाही पोलिसांनी शेवटपर्यंत नकार दिला. त्यांच्या कुटुंबाला सरकारने मदत वगैरे देणे तर दूरच राहिले. शहा यांच्यासारखी शेकडो कुटुंबे नोटाबंदीच्या निर्णयानंतर कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने पोरकी झाली. मात्र सरकारने कुणाचीहीजबाबदारी घेतली नाही. उलट नोटाबंदी हीच कशी हितावह आहे, याची लंबीचौडी भाषणे दिली, याबद्दल शहा यांच्या शेजाºयांनी तीव्रनापसंती व्यक्त केली. भार्इंदर पश्चिमेतील शिवसेना गल्लीतील हमीरमल कुटीरमध्ये राहणारे कार्तिक शहा हे घराजवळील जिन्यापाशी कोसळले. शेजाºयांनी त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी आपल्या ७०० रुपयांच्या फीकरिता जुन्या नोटा स्वीकारण्यासनकार दिला. त्यामुळे कार्तिक यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे निधन झाले. कार्तिक हे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी व्हॅन चालवून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पश्चात पत्नी डिंपल, एक १४ वर्षांची मुलगी व १० वर्षांचा पुत्र वर्धमान असा परिवार आहे. कार्तिक यांचे मेव्हणे माहिपाल पटेल यांनी आता या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. कार्तिक यांची स्कूल व्हॅनचालवून ते या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कार्तिक यांच्यावर उपचार करण्यास नकार देणाºया डॉक्टरवर कारवाई करण्याची शहा कुटुंबाची मागणी अदखलपात्र राहिली. नोटाबंदी झालेली नसती तर कार्तिक यांच्यावर वेळीच उपचार झाले असते व कदाचित ते वाचले असते, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली. ती कोण भरून देणार, असा सवाल शहा यांच्या निकटवर्तीयांनी केला.नोटाबंदीचा त्रासलोकप्रतिनिधी व बड्यानेत्यांना झाल्याचे दिसतनाही. रांगा लावून मरणपावली ती सामान्यमाणसंच. नोकºया गेल्या,रोजगार बुडाला, महागाईवाढली. नोटाबंदीचाफायदा झालाच असेलतर तो बडे नेते,लोकप्रतिनिधी आणि बडेउद्योजक यांनाच झालाआहे. भ्रष्टाचार कमीझालेला नाही. सामान्यलोकांच्या यातना काहीकमी झालेल्या नाहीत.- दीपिका अ. पाटील,तरु णीदोन वर्षांपूर्वीदेशात अचानक नोटाबंदी लागू करण्यात आली.माझ्यासारख्या रिक्षाचालकाला मनातून वाटले की,चला देशातील काळा पैसा बाहेर येईल.श्रीमंतांची गोची करणारा सरकारचा निर्णयचांगला आहे. मात्र दोनच दिवसांत हा निर्णयकिती घातक आहे, याची प्रचिती आली. दोनवर्षे उलटून गेली तरी त्याच्या झळा नागरिकांनाबसत आहेत. विशेषकरून आमच्यासारख्यारिक्षाचालकांना एखाद्या प्रवाशाने दोन हजाररुपयांची नोट दिली की, सुट्टे पैसे कुठूनआणायचे असा प्रश्न पडतो. अन्य नोटाहीबाजारात हळूहळू आल्या. हा निर्णय चुकीचाहोता. - नरेंद्र घुगे, रिक्षाचालकनोटाबंदीचा फटका केवळ सामान्यांना बसलानाही. तर उद्योजकांनाही बसला. अनेकउद्योजकांनी त्या वेळी प्रतिक्रियादिल्या होत्या की, नोटाबंदीमुळे धंदा घाट्यातआला. जास्त फटका सामान्यांनी सहन केलाअसेल तर त्याच्या पाठोपाठ उद्योजकांनाहीबसला. नोटाबंदीमुळे पगार थकले होते.अनेक उद्योजकांची नोटाबंदीत घसरलेलीगाडी अद्याप रुळावर आलेली नाही.सगळ्याच अर्थव्यवस्थेला मोठा फटकाबसला. भारत कॅशलेस न होता बेसलेसझाला तेही अर्थकारणाच्या बाबतीत. याच्याझळा भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत बसूशकतात. -स्वप्निल पवार, इंजिनीअर

टॅग्स :Note BanनोटाबंदीDemonetisationनिश्चलनीकरण