शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय राजवट समाप्त, लोकशाही उत्सव सुरू, साडेतीन वर्षांनंतर महासभा गजबजणार 

By सदानंद नाईक | Updated: February 2, 2026 18:30 IST

अश्विनी निकम व अमर लुंड यांच्या महापौर व उपमहापौर पदावर होणार शिक्कामोर्तब

- सदानंद नाईक उल्हासनगर : गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपून पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सवाला सुरूवात होत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता महापालिका महासभा भरणार असून महापौर पदी अश्विनी निकम व उपमहापौर पदी अमर लुंड यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप आणि शिंदेसेना यांनी महायुती केली असून महापौर व उपमहापौर पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड केवळ औपचारिक उरली आहे. शिंदेसेनेतील ओमी कलानी टीमच्या अश्विनी निकम यांचा महापौर पदासाठी तर भाजपचे अमर लुंड यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज आले आहेत. यामुळे शहराला नवीन महापौर आणि उपमहापौर मंगळवारी मिळणार आहे.  महापालिका प्रशासनाने महासभागृहाची रंगरंगोटी करून नगरसेवकांसाठी आकर्षक नवीन खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर यांच्या ऐतिहासिक अशा जुन्या लाकडी खुर्च्यांनाच पॉलिश आणि दुरुस्ती करून त्यांचे वैभव जपण्यात आले आहे. 

महापौर व उपमहापौर कार्यालये सज्ज महापालिका महासभागृहा प्रमाणे महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनांचेही नूतनीकरण केले असून दोन्ही कार्यालयांमध्ये नवीन फर्निचर आणि खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. कार्यालयाच्या कामकाजासाठी कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात आला आहे. आता केवळ मंगळवारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असून, महापालिका सचिव कार्यालयही अद्यावत करण्याची मागणी जोर धरत आहे. 

साडे तीन वर्षाची प्रशासकीय राजवट समूष्टात साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर लोकप्रतिनिधींच्या हाती शहराची सूत्रे जात आहेत. नवीन ऊर्जा आणि उत्साहात शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Municipal Corporation: Administrative Rule Ends, Democracy Resumes After Three Years

Web Summary : Ulhasnagar is set to resume democratic governance after three and a half years. The municipal corporation will elect Ashwini Nikam as mayor and Amar Lunde as deputy mayor. The municipal building has been renovated, and citizens anticipate a renewed focus on city development.
टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६