कल्याण-डाेंबिवलीत १,६९३ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:32+5:302021-04-05T04:36:32+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी तब्बल एक हजार ६९३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २४ तासांत ...

Addition of 1,693 patients in Kalyan-Dambivali | कल्याण-डाेंबिवलीत १,६९३ रुग्णांची भर

कल्याण-डाेंबिवलीत १,६९३ रुग्णांची भर

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी तब्बल एक हजार ६९३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९८१ रुग्णांना उपचारांती बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर भर पडल्याने सध्या १० हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा ८४ हजार ११६ पर्यंत पोहोचला आहे. यातील ७२ हजार ५३९ रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २६९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेत २५३, डोंबिवली पूर्वेत ५१०, कल्याण पश्चिमेत ६५०, डोंबिवली पश्चिमेला २०५, मांडा टिटवाळा ५२, तर मोहना २० आणि पिसवलीत तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी आढळलेली रुग्णसंख्या आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. एप्रिलपासून आढळणारे नवीन रुग्ण एक हजारांच्या आसपास असून रविवारी तर १६९३ हा आकडा गाठला. चार दिवसांत चार हजार ९४३ नवे रुग्ण आढळून आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन हजार २५४ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत.

------------------------------------------------------

Web Title: Addition of 1,693 patients in Kalyan-Dambivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.