आदर्श तहसीलदार पुरस्काराने अधिक पाटील यांचा सन्मान
By नितीन पंडित | Updated: August 1, 2023 17:03 IST2023-08-01T17:02:26+5:302023-08-01T17:03:24+5:30
भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांचा आदर्श तहसीलदार पुरस्काराने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला.

आदर्श तहसीलदार पुरस्काराने अधिक पाटील यांचा सन्मान
भिवंडी: भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांचा आदर्श तहसीलदार पुरस्काराने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या विशेष सन्मान कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तहसीलदार पाटील यांचा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाई,उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे,सुदाम परदेशी,विश्वास गजरे,रेवती गायकर,
अर्चना कदम यांसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने भिवंडी महसूल अधिकाऱ्यांनी तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमादरम्यान भिवंडी उप विभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत,अप्पर भिवंडी येथील मंडळ अधिकारी अतुल नाईक,शेलार येथील मंडळ अधिकारी किरण भागवत,अव्वल कारकून मंजुषा कासने,कारीवली येथील तलाठी रूपेश कारभारी,कोतवाल चैतन्या पवार यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे.