अल्पसंख्याक समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न गरजेचे अभिनेत्री सलमा आगाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:10 IST2019-02-05T22:05:42+5:302019-02-05T22:10:42+5:30
भिवंडी : अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण नसल्याने सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली असून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची फार मोठी ...

अल्पसंख्याक समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न गरजेचे अभिनेत्री सलमा आगाचे आवाहन
भिवंडी : अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण नसल्याने सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली असून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची फार मोठी मदत होऊ शकते. त्यासाठी सर्वानी पक्षभेद विसरून संघटीत होऊन एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेत्री व गायिका सलमा आगा यांनी भिवंडीतील एका शाळेच्या कार्यक्रमांत केले.
शहरातील कैसर बेगम इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी अभिनेत्री व गायीका सलमा आगा आल्या होत्या.
या कार्यक्रामात प्रमुख अतिथी म्हणून महापौर जावेद दळवी,सभागृह नेता मतलुब सरदार, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अरफात खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष शोयब खान, समाजसेवक नईम दळवी यांच्यासह शाळेचे संचालक व पादाधिकारी उपस्थित होते . या प्रसंगी अभिनेत्री सलमा आगा यांनी आपल्या भाषणात पुढे सांगीतले की, शाळांच्या मोठमोठ्या इमारती उभारून शिक्षणाचा दर्जा सुधारत नसून तर त्यासाठी जे प्रामामिक प्रयत्न केले जातात त्यामुळे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांमधील दर्जा ठरत असतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनातून दलित समाज शिक्षित झाला. त्यापासून मुस्लिम समाजाने प्रेरणा घेऊन शिक्षित होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्र माच्या प्रारंभी कैसर बेगम एज्युकेशनल सोसायटीचे चेअरमन मुस्ताक अहमद बेग, उपाध्यक्ष शौकत अहमद आझमी यांनी मान्यवरांचे स्वागत सन्मान केले. तसेच पाहुण्यांच्या शुभहस्ते कला व क्रिडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शाहिना वकार अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्र मास शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलमा आगा ह्या स्वत:च्या गाण्यावर कार्यक्रमांतील चिमुकल्यांसह थिरकल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण केला. ‘झुम झुम झुम बाबा‘या गाण्यावर चाळीस वर्षांपूर्वी तरूणाईला थिरकायला लावणारी सलमा आगा काल सोमवार रात्री शाळेच्या कार्यक्रमांत थिरकली. व्यासपिठावर विद्यार्थ्यांसोबत नृत्य करीत असतानाच शाळेच्या शिक्षिकांना सुध्दा आपल्या नृत्यात सहभागी करून घेतले. यावेळी त्यांची कन्या झरा आगा खान या सुध्दा नृत्यात सहभागी झाल्या. या प्रसंगानंतर उपस्थित पालक व विद्यार्थी त्यांच्या अभिनयाने हरखून गेले.